कोकण

सकाळी धुके, दुपारी उन्हाचा कडाका

CD

-rat१३p१५.jpg-
२६O३०६३४
दापोली ः जिल्ह्यातील विचित्र हवामानाचा फटका लगडलेल्या हापूस आंब्याला बसण्याची शक्यता आहे.
----
सकाळी धुके, दुपारी उन्हाचा कडाका
जिल्ह्यात विचित्र वातावरण ; कमाल तापमान ३८ अंशावर, बागायतदार चिंतेत
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १३ : कोकणातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली शहरात गेले दोन दिवस पहाटेपासून पांढऱ्याशुभ्र दाट धुक्याची चादर पसरल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळी थंडी आणि दुपारी कडकडीत उन्हाचा तडाखा असे विचित्र वातावरण अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या पर्यटकांना दुपारी कडकडीत उन्हाचा कडाका सहन करावा लागत आहे. अजून दोन दिवसात उन्हाचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात विचित्र वातावरण पाहायला मिळत आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत आहे. गेले दोन दिवस सकाळी साडेआठ वाजले तरीही धुक्याची तीव्रता कमी झालेली नव्हती. काही ठिकाणी समोरचे काही फूट अंतरही स्पष्ट दिसत नसल्याने वाहनचालकांना वाहनांचे दिवे सुरू ठेवून प्रवास करावा लागत होता. त्यामुळे वाहन चालवताना अधिक सावधगिरी बाळगावी लागत होती. कामावर जाणारे नोकरदार, शाळकरी मुले तसेच फिरायला बाहेर पडलेले नागरिक या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेताना दिसले.
धुक्यामुळे दृश्यमानता कमी होत असल्याने वाहनचालकांनी वेग मर्यादित ठेवून सुरक्षित अंतर राखत वाहन चालवावे, असे आवाहनही केले गेले. दापोलीत अनुभवायला मिळालेल्या या धुक्याच्या चादरीने निसर्गप्रेमींना भुरळ घातली आहे.
सकाळच्या सत्रात निसर्गातील बदलाचा सुखद आनंद घेत असतानाच दुपारी कडकडीत उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले होते. कमाल पारा ३३ वरून ३८ अंशावर पोचलेला होता. सलग पाच दिवस पारा ३६ अंशावर स्थिर होता. त्यामुळे उन्हाची तीव्रता अधिकच वाढलेली होती. या वातावरणाचा परिणाम आंबापिकावर अधिक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धुक्यामुळे कैरीवर काळे डाग पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कडकडीत उन्हामुळे कैरी पिवळी होऊन गळण्याची शक्यता आहे. याचा फटका आधीच गर्तेत अडकलेल्या आंबा बागायतदारांना बसणार आहे. बदललेल्या वातावरणाला सामोरे जाण्यासाठी बागांचे व्यवस्थापन करण्याच्या सूचना कोकण कृषी विभागाने दिल्या आहेत.
-------
तारीख* कमाल (अं.सें.)* किमान (अं.सें.)
४ मार्च* ३५.७* १४.३
५ मार्च* ३७.१* १३.१
६ मार्च* ३६.७* ११.७
७ मार्च* ३६.८* ११.५
९ मार्च* ३६.६* १२.५
१० मार्च* ३८* १२.९
११ मार्च* ३७.७* १५.९
१२ मार्च* ३४.०* १७.८
१३ मार्च* ३३.०* १७.८
----
दोन दिवसांत कमाल तापमान वाढणार
गेल्या वर्षी झालेल्या अनियमित पावसाच्या परिणामामुळे दापोलीतील हवामानात बदल जाणवत आहेत. मे महिन्यात १९ तारखेपासून पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर २७ मे २०२५ रोजी तब्बल २३७ मिमी पावसाची नोंद झाली. मे महिन्यात सुरू झालेला हा पाऊस नोव्हेंबरच्या ३ ते ४ तारखेपर्यंत सुरू राहिल्याने वातावरणात मोठे बदल घडले. नोव्हेंबरपासून थंडीचे प्रमाण वाढू लागले होते. ११ डिसेंबर २०२५ रोजी किमान तापमान ६.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरू असतानाही सकाळी धुके व गारठा जाणवत असून, सकाळी १० नंतर उष्णतेचा तीव्रपणा वाढत आहे. १० मार्च २०२६ रोजी कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. राजे महाडीक यांनी दिली.
----
कोट
दापोली परिसरातील हवामानातील अनियमित बदलांचा परिणाम काजूबागांवरही होत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत सकाळी धुके व गारठा जाणवत असताना दुपारनंतर अचानक उष्णता वाढत असल्याने काजूच्या मोहोरावर परिणाम होत आहे. तापमानातील अशा चढ-उतारांमुळे मोहोर गळणे, करपून जाणे, काजू फळांची वाढ मंदावणे यासारख्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.
- अरविंद मांडवकर, काजू बागायतदार, रूखी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

GT vs RCB Live: विराट कोहलीने घातला राडा! रजत पाटीदारच्या विकेटवरून संतापला, जेसन होल्डरच्या झेलवरून अम्पायरसोबत वाद Video

RTE Admission Deadline Extended: आरटीई २५ टक्के राखीव प्रवेशांसाठी अंतिम मुदतवाढ; पालकांना ८ मे पर्यंत संधी

Maharashtra Private School Fee Refund: खासगी शाळांना शुल्क परतावा धोरणाच्या दिशेने एक पाऊल; प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

सोलापूरच्या पोलिस दलातील ‘या’ १५ अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह! महाराष्ट्र दिनानिमित्त आज पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव, वाचा...

SCROLL FOR NEXT