कोकण

ऑन कॉल रक्तदाते संस्थेचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

CD

swt1617.jpg
31239
गया ः येथे ऑन कॉल रक्तदाते संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करताना मान्यवर.

ऑन कॉल रक्तदाते संस्थेचा
राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः रक्तदान क्षेत्रात भारतात आघाडीवर असणाऱ्या शहीद भगतसिंग युथ ब्रिगेड गयाजी (बिहार) या संस्थेने गया येथील कार्यक्रमात रक्तदान क्षेत्रात देशभरात कार्यरत असणाऱ्या विविध संस्थांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान केला. यावेळी ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गचाही सन्मान करण्यात आला.
विशेष म्हणजे, चंद्रशेखर आझाद यांचे वंशज अमित आझाद यांच्या हस्ते हा सन्मान संस्थेचे सचिव बाबली गवंडे यांनी स्वीकारला. यावेळी भारतातील विविध राज्यांतील १७० हून अधिक रक्तदान क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचा सन्मान करण्यात आला. नेपाळमधील सुद्धा काही संस्थांनाही गौरविण्यात आले. ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने केलेल्या कार्याची देशपातळीवर स्वातंत्र्यासाठी संपूर्ण देशात क्रांती घडवणाऱ्या शहीद भगतसिंग यांच्या नावाने रक्तदान चळवळ चालवणाऱ्या संस्थेकडून दखल घेण्यात आली.
संस्थेच्या कार्यासाठी रात्रंदिवस धडपड करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक करून सर्व रक्तदात्यांना हा सत्कार समर्पित करतो, असे श्री. गवस यांनी सांगितले. संस्थेला हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध सामाजिक संस्था व हितचिंतकांनी संस्थेचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भयानक सत्य उघड! प्राणी, वृद्ध महिला आणि स्वतःच्या मुलीलाही सोडलं नाही... नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या विकृत कृत्यांचा इतिहास समोर

या चिमुरडीने साकारलीय राजा शिवाजी सिनेमात लहानग्या सईबाई राणीसाहेबांची भूमिका !

क्षुल्लक कारणावरून वादाला तोंड फुटलं; रागात महिलेनं मैत्रिणीच्या १४ वर्षीय मुलाला संपवलं, नेमकं काय घडलं?

Thane: ठाण्यात पाणीकपात लागू, पाणीपुरवठा महिन्यातून दोनवेळा बंद, कुठे आणि कधी?

टोळक्यानं भररस्त्यात गाठलं; काठी, कोयता आणि दगडाने तब्बल ३५ वार, सोलापुरात तरुणाला क्रूरपणे संपवलं, भयंकर कारण समोर

SCROLL FOR NEXT