कोकण

-बॅंक ऑफ इंडिया स्टाफ युनियनचे आज आंदोलन

CD

बॅंक ऑफ इंडिया युनियनचे आज आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ः बॅंक ऑफ इंडियामधील फेडरेशन ऑफ बॅंक ऑफ इंडिया स्टाफ युनियन या संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बॅंक व्यवस्थापनाविरूद्ध आंदोलनात्मक कार्यक्रम जाहीर केला आहे. या आंदोलनाची सुरुवात मंगळवारपासून (ता. १७) होणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या मते ग्राहकांना अधिक चांगली सेवा देता यावी यासाठी बॅंकेत क्लार्क, शिपाई आणि आर्मगार्ड पदावर पुरेशी भरती करणे आवश्यक आहे. तसेच कायमस्वरूपी नोकऱ्यांचे आऊटसोर्सिंग थांबवावे, रोजंदारी कामगारांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी आणि औद्योगिक विवाद कायद्याचे पालन करावे, अशा प्रमुख मागण्या संघटनेने मांडल्या आहेत. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात मंगळवारी (ता. १७) देशभरातील झोनल कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. त्यानंतर २४ मार्चला धरणे आंदोलन आणि ३० मार्चला देशव्यापी संप जाहीर करण्यात आला आहे. रत्नागिरीतही या आंदोलनाला प्रतिसाद देत बॅंक ऑफ इंडिया झोनल ऑफिसच्या आवारात निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती बॅंक ऑफ इंडिया स्टाफ युनियनचे अध्यक्ष विनोद कदम यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adinath Maharaj: आदिनाथ महाराज नेमके कसे जखमी झाले? प्रत्यक्षदर्शी काय सांगतात? ९ वर्षांपूर्वी महाराज झाले होते बेपत्ता

Phaltan Politics: फलटणमध्ये सेटलमेंटचं राजकारण? भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा सभापती; रामराजेंचा गटही धक्कादायकरित्या सत्तेत..

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावर मंत्र्यांचा यु-टर्न! संघटनांच्या संतापानंतर सरकारची माघार; थेट अटकेच्या मुद्द्यावर भूमिका बदलली

IPL 2026 मध्ये २-३ हजार धावा करायच्या आहेत! वैभव सूर्यवंशीचा आत्मविश्वास पाहून सारेच चक्रावले; म्हणाला, वैयक्तिक विक्रम...

SCROLL FOR NEXT