IPL 2026 मध्ये २-३ हजार धावा करायच्या आहेत! वैभव सूर्यवंशीचा आत्मविश्वास पाहून सारेच चक्रावले; म्हणाला, वैयक्तिक विक्रम...

Vaibhav Sooryavanshi 2000 runs IPL 2026 comment: आयपीएल २०२६ हंगाम सुरू होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी चर्चेत आला आहे. जयपूरमध्ये झालेल्या एका मीडिया संवादादरम्यान त्याने केलेल्या विधानामुळे उपस्थित पत्रकार आणि चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 expectations and goals

Vaibhav Sooryavanshi IPL 2026 expectations and goals

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi focus on IPL trophy for Rajasthan Royals: भारतीय संघाचा युवा स्टार वैभव सूर्यवंशी पुन्हा इंडियन प्रीमिअर लीग २०२६ गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. मागच्या पर्वात पदार्पण करून त्याने अनेक विक्रमं केली.. आयपीएलमध्ये वेगवान शतक झळकावणाऱ्या युवा फलंदाजाचा मान त्याने पटकावला. त्यानंतर त्याने भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करताना वर्ल्ड कप विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. आता त्याने संपूर्ण लक्ष IPL 2026 कडे वळवलं आहे. १९ वर्षांच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये त्याने १७५ धावांची वादळी खेळी केली होती. आता त्याला युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल याचा आयपीएलमधील १७५ धावांचा विक्रम मोडायचा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com