- rat१८p५.jpg-
P26O31673
देवरूख ः वायगणे रस्त्याची झालेली दुर्दशा.
-----------
वायंगणे रस्त्याची दयनीय अवस्था
निधी असूनही रस्ता खड्ड्यातच ; ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थ संतापले
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. १८ ः संगमेश्वर तालुक्यातील वायंगणे गावातील मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, रस्ता दुरुस्तीसाठी निधी मंजूर होऊन वर्ष उलटले तरी अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. आमदार शेखर निकम यांनी या रस्त्यासाठी विशेष पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला; मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदाराच्या उदासीनतेमुळे हे काम रखडल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
वायंगणे गावाला जोडणारा हा रस्ता पूर्णपणे उखडला असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्यावरून चालणेही कठीण होते. रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी किंवा शालेय विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करूनही प्रशासकीय पातळीवर फाईली अडकून पडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आहे. निधी मंजूर झाल्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू होणे अपेक्षित होते; मात्र, ठेकेदाराकडून टाळाटाळ केली जात असल्याने आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्याची अवस्था अधिकच दयनीय झाली आहे. यामुळे शासनाचा निधी पडून आहे आणि जनतेला मात्र हाल सोसावे लागत आहेत.
-------
कोट
आमदार शेखर निकम यांनी आमच्या मागणीची दखल घेऊन तत्परतेने निधी मंजूर केला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत; पण दुर्दैव असे की, निधी हातात असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार कामात टाळाटाळ करत आहेत. वर्षभर आम्ही पाठपुरावा करत आहोत; पण प्रशासनाला जाग येत नाहीये. जर लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर आम्हाला तीव्र आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. ग्रामस्थांच्या संयमाचा अंत पाहू नका.
--परशुराम घडशी, माजी सरपंच, वायंगणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.