कोकण

सहकारातील समस्यांवरील मार्गाचे अनुभवसिद्ध पुस्तक

CD

-rat१८p३.jpg-
२६O३१६७१
रत्नागिरी : स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमावेळी बोलताना डॉ. उदय निरगुडकर. सोबत डावीकडून माधव गोगटे, दीपक पटवर्धन, संतोष थेराडे, संतोष प्रभू.
---------
सहकार क्षेत्रासाठी ‘सहकार स्वरूपा’ दीपस्तंभ
उदय निरगुडकर ः अॅड. पटवर्धन यांच्या पुस्तकाचे प्रकाशन, युवकांसाठी रोल मॉडेल
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था व रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या ‘सहकार स्वरूपा’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकात त्यांच्या ३५ वर्षांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची कहाणी आहे. सहकार क्षेत्रातील समस्या आणि त्यावर काढलेले मार्ग यांचा अनुभवसिद्ध उहापोह या पुस्तकात असल्याने हे एक आदर्श ‘टेक्स्टबुक’ ठरू शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक उदय निरगुडकर यांनी व्यक्त केले.
स्वयंवर मंगल कार्यालयात हा सोहळा झाला. भारताचा खरा अंत्योदय सहकारातूनच होऊ शकतो. त्यामुळे हे पुस्तक विविध भारतीय भाषांमध्ये अनुवादित व्हावे. मुंबईत स्वप्न घेऊन जाणाऱ्या युवकांनी कोकणात राहून कार्य करण्यासाठी हे पुस्तक रोल मॉडेल ठरावे, असेही निरगुडकर यांनी सांगितले.
या वेळी मंचावर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष संतोष थेराडे, आकाशवाणीचे निवृत्त अधिकारी सुहास विद्वांस, स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष माधव गोगटे आणि रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे उपाध्यक्ष संतोष प्रभू उपस्थित होते.
अॅड. दीपक पटवर्धन म्हणाले, आजचा कार्यक्रम मनाला स्पर्शून गेला. लहानपणी शिक्षिका असलेल्या आईकडून ध्रुवबाळाची गोष्ट ऐकताना चिकाटी आणि ध्येयाची प्रेरणा मिळाली. आईचे पाठबळ आणि वडिलांचा आधार यामुळेच आयुष्यात अनेक संस्थांमध्ये अढळ स्थान मिळवता आले. आज माझ्या जीवनप्रवासात मार्गदर्शन करणारे अनेक मान्यवर आले आहेत, हा आनंदाचा क्षण आहे. या प्रसंगी अंकिता पटवर्धन, सुहास विद्वांस यांनीही मनोगत व्यक्त केले.
----------
चौकट १
सहकारातून देवराई जतन करा
कोकणात वाढत्या वृक्षतोडीमुळे डोंगर बोडके होत आहेत. यशस्वी सहकाराच्या माध्यमातून देवराई उभी करण्याची संधी आहे, असे मत डॉ. निरगुडकर यांनी व्यक्त केले. लोकमान्य टिळकांनी जशी गर्जना केली होती तशीच आज अॅड. पटवर्धन यांनी ‘सहकार हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी प्रेरणादायी भूमिका मांडल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कागदपत्रे द्या किंवा जागा खाली करा...; एसआरएने धारावी पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना अंतिम नोटीस बजावली, किती दिवसांची?

मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

25 मार्चपासून 'या' राशींचा गोल्डन टाईम सुरू ! राजासारखं जगणार आयुष्य ; पैसा, गाडी, करियर सगळ्यात होणार प्रगती

आधी तुकड्यांमध्ये शरीराचे अवयव, नंतर संपूर्ण सांगाड्यासारखे शरीर आढळले; महामार्गावर मुरूम टाकताना धक्कादायक प्रकार समोर

Gudi Padwa Special Sugar-Free Dates Shrikhand: गुढी पाडव्याला मधुमेहीदेखील खाऊ शकतील श्रीखंड; खजूर श्रीखंडाची रेसिपी लगेच वाचा

SCROLL FOR NEXT