कोकण

कसब्यात शिंपणे उत्सवात लाल रंगाची उधळण

CD

-rat१८p२१.JPG-
P२६O३१७८८
संगमेश्वर ः कसबा येथील शिंपणे उत्सवात लाल रंगात न्हाऊन निघालेले ग्रामस्थ.
------
जाखमातेच्या उत्सवात रंगांची उधळण
हजारो भाविकांचा सहभाग ; मटण-भाकरी प्रसादाचे आकर्षण
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १८ ः रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा संगमेश्वर येथे देवी जाखमातेचा पारंपरिक शिंपणे उत्सव बुधवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला. लाल रंगाची उधळण, पारंपरिक फेऱ्या, धार्मिक विधी आणि मटण-भाकरीच्या प्रसादामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविकांनी याला हजेरी लावली होती. दिवसभर झालेल्या लाल रंगाच्या उधळणीमुळे कसबा-संगमेश्वर परिसरातील रस्ते लाल रंगाने न्हाऊन निघाले. पोलिस बंदोबस्तामुळे सर्व कार्यक्रम शांततेत पार पडले.
उत्सवाची सुरुवात आणि सांगता ढोलताशांच्या गजरात काढल्या जाणाऱ्या फेऱ्यांनी झाली. दुपारी तीनच्या सुमारास निघालेला मुख्य फेरा विशेष आकर्षण ठरला. बैलगाड्यांमधून आणलेल्या रंगाच्या पिंपांतील लाल रंग भाविकांवर उधळला गेला. रस्त्यालगतच्या घरांतूनही रंगोत्सवात उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
पहाटेपासूनच मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. चंडिका मंदिर, निनावी मंदिर आणि जाखमाता मंदिरात महिलांनी खणा-नारळाने ओटी भरत देवीचे पूजन केले. पारंपरिक रखवालीमध्ये नारळ, कोंबडे आणि बकऱ्यांचा समावेश होता. यापासून तयार करण्यात आलेला प्रसाद हजारो भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने मटण-भाकरी स्वरूपात वाटप करण्यात आला.
लहान मुलांसाठी पाण्याचे हौद उभारण्यात आले होते. ढोल, झांज पथक आणि डिजेच्या तालावर चार तासांहून अधिक काळ उत्सवाचा जल्लोष सुरू होता. घराघरांत पाहुणचाराचे आयोजन करण्यात आले होते. रात्री मानकरी मंडळींच्या उपस्थितीत पाण्याचा हौद फोडून प्रसाद वाटपानंतर उत्सवाची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati News : बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम; राज्य शासनाने घेतला निर्णय

मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

25 मार्चपासून 'या' राशींचा गोल्डन टाईम सुरू ! राजासारखं जगणार आयुष्य ; पैसा, गाडी, करियर सगळ्यात होणार प्रगती

आधी तुकड्यांमध्ये शरीराचे अवयव, नंतर संपूर्ण सांगाड्यासारखे शरीर आढळले; महामार्गावर मुरूम टाकताना धक्कादायक प्रकार समोर

कागदपत्रे द्या किंवा जागा खाली करा...; एसआरएने धारावी पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना अंतिम नोटीस बजावली, किती दिवसांची?

SCROLL FOR NEXT