कोकण

लोटेतील अकरा ग्रामपंचायतींचा लक्ष्मी ऑरगॅनिकला विरोध

CD

लोटेतील ११ ग्रामपंचायतींचा
लक्ष्मी ऑरगॅनिकला विरोध
ठराव मंजूर; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, कंपनी बंद होईपर्यंत लढणार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ ः लोटे एमआयडीसीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल कंपनीविरोधातील आंदोलनाला अधिक धार आली आहे. लोटे परिसरातील 11 ग्रामपंचायतींनी विरोधाचा ठराव मंजूर केला आहे. त्यानंतर याबाबत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना ग्रामपंचायतींच्या ठरावाची प्रत करून निवेदन देण्यात आले.
याबाबत प्रमुख आंदोलकांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन पुढील भूमिका स्पष्ट केली. या बैठकीत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देत कंपनी बंद होईपर्यंत संविधानिक व लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवणार असल्याचे आंदोलकांनी ठामपणे सांगितले. धामणदेवी, आंबडस, भेलसई, लोटे, गुणदे, आवाशी, चिरणी, घाणेखुंट, सोनगाव, कालुस्ते बुद्रुक आणि शेल्डी अशा एकूण 11 ग्रामपंचायतींनी एकमुखाने ठराव मंजूर करून कंपनीविरोधात भूमिका घेतली आहे. या वेळी संजय आंब्रे, संजय साळवे, रवींद्र गोवळकर, अविनाश आंब्रे, किशोर आंब्रे, संजय आंब्रे, उदय घाग, सुबोध सावंत-देसाई आदी उपस्थित होते.
सर्व ग्रामपंचायतींनी एकत्र येत जनतेच्या हितासाठी आणि न्यायासाठी हा लढा कंपनी बंद होईपर्यंत सुरू ठेवणार, अशी एकमुखी ग्वाही दिली आहे. स्थानिक पातळीवर वाढत चाललेल्या या विरोधामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, पुढील काळात या आंदोलनाची दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया आता होणार अधिक स्मार्ट! गर्दी कमी करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; मेगा प्लॅन काय?

Manchar News : ‘पाणी नको, सिलिंग हटवा’चा नारा; आंबेगावात शेतकऱ्यांची एकजूट, न्यायालयीन लढ्याचा निर्धार

स्वामी भक्तांना अनोखी भेट; श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त “स्वामी गुरुमाऊली” गाणं प्रदर्शित

YIN Elections : ‘यिन’ निवडणुकीचा जल्लोष! तरुणाईचा उत्साह, गुलालाची उधळण, दुचाकी रॅली; विजयानंतर विद्यार्थ्यांचा जल्लोष

Petrol Price: महत्त्वाची बातमी! पेट्रोलचे दर वाढले; वाहनधारकांना मोठा फटका, नवे दर किती? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT