कोकण

राजापूर - जाती-पातीच्या पलीकडे जाऊन संघटित व्हा

CD

rat20p8.jpg-
32158
राजापूर ः हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. शुभम कुशे.

जातीपातीच्या पलीकडे जाऊन संघटित व्हा
डॉ. शुभम कुशेः छत्रपती संभाजी महाराज बलिदान महिना
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २१ : “औरंगजेबाच्या आदेशाने ज्यांचा अनेक दिवस अमानुष छळ करण्यात आला त्या छत्रपती संभाजी महाराजांनी स्वाभिमानाने धर्मासाठी अनन्वित यातना सहन केल्या; मात्र अखेरपर्यंत हिंदू धर्माचा त्याग केला नाही. त्यांच्या त्यागाला खरी आदरांजली म्हणून प्रत्येक हिंदूने जातीपातीच्या पलीकडे जाऊन संघटित होणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन डॉ. शुभम कुशे यांनी केले.
शहरात हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळण्यात आला. त्याची सांगता शहरातील श्रीदेव चव्हाटा मंदिर येथे करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. कुशे यांनी वरील प्रतिपादन केले.
या वेळी ते म्हणाले, “त्या काळात हिंदू राजा छत्रपती संभाजी महाराजांनी गाजवलेल्या पराक्रमामुळे औरंगजेबाची झोप उडाली होती. तब्बल नऊ वर्षे स्वराज्याच्या केसालाही धक्का लावता न आल्याने औरंगजेबाच्या मनात संभाजी महाराजांविषयी प्रचंड भीती आणि राग निर्माण झाला होता. दुर्दैवाने, दगाफटका झाल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले. अनेक दिवस अमानुष छळ सहन करूनही त्यांनी हिंदू धर्माचा आणि भगव्याचा त्याग केला नाही. हा त्यांनी घालून दिलेला आदर्श आजही प्रेरणादायी आहे.”

कोट
“आजही हिंदू समाजासमोर विविध आव्हाने उभी आहेत. परिस्थिती फार वेगळी नाही. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांची धर्मनिष्ठा आणि स्वराज्यनिष्ठा आदर्श मानून जागरूक राहणे आवश्यक आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन एकत्रित होणे हीच काळाची गरज आहे.”
- डॉ. शुभम कुशे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेअर मार्केट Crash मध्येही हे 10 शेअर्स ठरले धुरंधर! आठवड्यात 40% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का?

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Baby Girl Born : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कन्यारत्नाचे आगमन... आणि तेही रुग्णवाहिकेत! ; ‘१०८’ टीम ठरली देवदूत

Latest Marathi News Live Update : जळगावच्या होलसेल बाजारात इंडक्शन व इलेक्ट्रिक शेगड्यांचा तुटवडा

SCROLL FOR NEXT