32327
मानवसेवा हीच ईश्वर सेवा
गावडेकाका महाराज : माड्याचीवाडीत स्वामी समर्थ प्रगट दिन
कुडाळ, ता. २१ ः ‘‘स्वतःच्या जीवनाबरोबरच इतरांचे जीवन आनंदी करण्याचा प्रयत्न करा. मानवाची सेवा हीच ईश्वर सेवा आहे, हा विचार प्रत्येकाने आचरणात आणावा,’’ असा गुरुसंदेश प.पू. सद्गुगुरू समर्थ गावडेकाका महाराज यांनी दिला.
माड्याचीवाडी (ता.कुडाळ) येथे श्री स्वामी समर्थ प्रगत दिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी १५२ कलश अभिषेकांसह विविध धार्मिक विधी संपन्न झाले. माड्याचीवाडी येथील आध्यात्मिक सद्गुरू श्री श्री १०८ महंत मठाधिपती प.पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज संस्थापित श्री स्वामी समर्थ मठात हा सोहळा उत्साहात झाला. हजारो भाविकांनी स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेतला.
यानिमित्त सकाळी स्वामींच्या मूर्तीवर भाविकांच्या उपस्थितीत सामूहिक अभिषेक करण्यात आला. दुपारी महाआरती झाल्यानंतर अखंड महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. स्वामी समर्थ मठ ते श्री गावडोबा मंदिरापर्यंत भव्य पालखी सोहळा निघाला. चेंदवण येथील महिला ढोल पथक, माड्याचीवाडीचे ढोल पथक आणि वारकरी भजन पथक या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले.
यावेळी गावडेकाका महाराज म्हणाले, ‘‘जीवनात यशाचे शिखर गाठायचे असेल तर जिद्द, चिकाटी आणि मेहनतीसोबतच आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. आई-वडिलांनंतर गुरू हा जीवनातील महत्त्वाचा घटक असतो. गुरूच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल केल्यास यशाचा प्रवास सुकर होतो. जिथे ज्ञानाचा उगम होतो, जिथे जीवनाला परिपूर्णता मिळते आणि संकटावर मात करण्याची शक्ती मिळते, ते ठिकाण म्हणजे सद्गुरूंचे चरण होय.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.