बालनाट्य प्रशिक्षण
शिबिराचा समारोप
रत्नागिरी, ता. २१ः शहरात राज्यशासन सांस्कृतिक कार्य विभागामार्फत बालनाट्य प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. दैवज्ञ भवन हॉलमध्ये झालेल्या दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाला. शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ६ ते १५ वयोगटातील बालकलाकारांसाठी हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ३५ विद्यार्थी बालकलाकारांनी सहभाग नोंदवला.
या वेळी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, महिला व बालकल्याण सभापती प्रिती सुर्वे, नगरसेविका मेधा कुळकर्णी, प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे सदस्य राजेश गोसावी आदी उपस्थित होते. सहभागी झालेल्या सर्व बालकलाकारांनी लघुनाटिका, नाट्यछटा, एकपात्री, नाट्यसंगीताचे प्रभावी सादरीकरण केले. सर्व बालकलाकारांना प्रमाणपत्र व पुस्तक देण्यात आले. विविध तज्ञांचे मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिरात दहा दिवसात सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे नाट्य समन्वयक नंदकिशोर जुवेकर, रंगकर्मी संजय हळदीकर, प्रकाश पारखी, सत्यजित गुरव, अजिंक्य केसरकर, प्रदीप पेडणेकर, कीर्ती पेंढारकर, केयुरी दळवी, साई शिर्सेकर, सागर सकपाळ यांनी प्रशिक्षण दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.