32605
प्रवीण काकडे
धनगर समाज महासंघ
प्रदेशाध्यक्षपदी काकडे
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २२ : धोंडेवाडी (ता. कराड, जि. सातारा) येथील प्रवीण काकडे यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, दिल्लीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी पुनर्निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अजयपाल सिंह होळकर यांनी दिल्ली येथे या निवडीची अधिकृत घोषणा केली. काकडे यांच्या या निवडीमुळे त्यांचे संपूर्ण कोकणासह महाराष्ट्रातून अभिनंदन होत आहे.
काकडे यांनी महासंघात जिल्हा उपाध्यक्षपदापासून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यांच्या निष्ठेमुळे आणि कामाच्या झपाट्यामुळे त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत मजल मारली आहे. गेल्या २५ वर्षांपासून समाजकार्याचा वारसा जपला आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. गोरगरीब जनतेला मदत देण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवले आहेत. या निवडीबद्दल सर्वस्तरांतून काकडे यांचे कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.