

Irfan Pathan Picks MI Over CSK as the Greatest IPL Team
Sakal
Irfan Pathan Picks MI Over CSK as the Greatest IPL Team: इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी संघांमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघाचे नाव नेहमीच घेतले जाते. या दोन्ही संघांनी या स्पर्धेत नेहमीच आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. दोन्ही संघांनी आत्तापर्यंत प्रत्येकी पाचवेळा आयपीएलची ट्रॉफी उंचावली आहे. त्यामुळे या दोन्ही संघांपैकी सर्वोत्तम संघ कोणता याबाबत नेहमीच चाहत्यांमध्ये वाद होत असतात.
आता यातच भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने (Irfan Pathan) याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्सऐवजी (Chennai Super Kings) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) निवड केली आहे, त्याने कारणही सांगितले आहे.