33136
कलमठ बाजारपेठेसह नाडकर्णी नगरला
स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी
नागरिकांचे सरपंचांना निवेदन : प्रश्न सोडविण्याची सरपंचांची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २५ : कलमठ गावातील बाजारपेठ आणि नाडकर्णी नगर भागाला गेले काही दिवस दूषित पाणी पुरवठा होत होता. तर गेले चार दिवस पाणी पुरवठा बंद झाला आहे. सध्या पाणी टंचाईची स्थिती आहे. त्यामुळे बाजारपेठ आणि नाडकर्णी नगर भागाला तातडीने स्वच्छ पाणी पुरवठा करा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी आज केली. त्याबाबतचे निवेदन कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांना देण्यात आले.
कलमठ गावातील सर्व नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर आणि नगरपंचायत प्रशासन यांच्याशी चर्चा सुरू आहे. दोन दिवसांत नाडकर्णी नगर आणि बाजारपेठ भागाला स्वच्छ पाणी पुरवठा सुरू होईल, अशी ग्वाही सरपंच संदीप मेस्त्री यांनी नागरिकांना दिली.
कलमठ गावातील नाडकर्णी नगर रहिवासी संघाचे अध्यक्ष मनोज जाधव यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांची भेट घेऊन त्यांना स्वच्छ पाणी पुरवठ्याबाबतचे निवेदन दिले. यावेळी कणकवली नगरपंचायतीच्या नळयोजनेतून बाजारपेठ आणि नाडकर्णी नगर भागाला पाणी पुरवठा देण्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याची माहिती सरपंच मेस्त्री यांनी दिली. या चर्चेवेळी कलमठ ग्रामसेवक श्री. कुडतरकर, नाडकर्णी नगर रहिवासी संघाचे अध्यक्ष मनोज जाधव, एकनाथ वांयगणकर, शिवम धानजी, बन्सी माळवदे, प्रदीप ढवण, पंढरीनाथ दळवी, सुरेश सावंत, विकास पेडणेकर, सुदेश देसाई, नितीन पटेल, श्रीराम जोशी, नितीन पावसकर, प्रभाकर सावंत, पूजा जाधव, सुनीता चव्हाण आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.