कोकण

दिव्यांगासाठी पालकमंत्री मैदानात

CD

दिव्यांग्यांसाठी
पालकमंत्री मैदानात
रत्नागिरी : दिव्यांग प्रमाणपत्राबाबत येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे सोमवारी (ता. ३०) मार्चला सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वत: उपस्थित राहणार आहेत. या वेळी दिव्यांगांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दिव्यांग प्रमाणपत्र देण्यातील त्रुटी, दिव्यांग टक्केवारी ठरवण्यातील समस्या, दिव्यांग प्रमाणपत्राबाबत प्रलंबितता शिवाय ते मिळवताना येणाऱ्या अडचणी, अशा विविध समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री डॉ. सामंत हे स्वत: उपस्थित राहून या समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहेत. या वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये हे देखील उपस्थित राहणार आहेत.


नवोदय विद्यालयासाठी
सावर्डेतील विद्यार्थी पात्र
सावर्डे ः भारत सरकारच्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्यावतीने घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपरीक्षेत सह्याद्री शिक्षणसंस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथील आठ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या परीक्षेसाठी पाचवीतील एकूण ११ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी स्वराज कर्डिले, समर्थ सोनवणे, ओम सावर्डेकर, शार्दूल गोरे, अथर्व बंडगर, दर्शन कदम, श्रीपाद धुरी आणि वसुंधरा पाटील या आठ विद्यार्थ्यांनी यश मिळवून विद्यालयाचा गौरव वाढवला आहे. या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख साजिद चिकटे तसेच प्रशांत सपकाळ, सुधीर कदम, अमित साळवी, मंगेश दाते, दीपक भुवड, सिद्धी सावंत, शिल्पा राजेशिर्के व श्रुती जाधव यांनी मार्गदर्शन केले.


चिपळुणातील शाळांना
आदर्श पुरस्कार
चिपळूण : पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने राबवलेल्या आदर्श शाळा उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा कुशिवडे, मांडकी खुर्द, आंबतखोत तांबडवाडी आणि वालोटी नं. १ या शाळांना आदर्श शाळा पुरस्काराने सभापती, उपसभापती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. चिपळूण पंचायत समितीच्या शिक्षण विभागांनी शाळांच्या प्रगतीसंदर्भात राबवलेल्या उपक्रमात जिल्हा परिषद शाळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये आदर्श शाळा म्हणून काही शाळांना गौरवण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद शाळा कुशिवडे, जिल्हा परिषद शाळा मांडकी खुर्द, आंबतखोत तांबडवाडी आणि वालोटी शाळा नं. १ या चार शाळांना पंचायत समितीच्या मासिक सभेत सभापती सूर्यकांत खेतले, उपसभापती संदेश आयरे आणि गटविकास अधिकारी उमा घारगे पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी सर्व सदस्य उपस्थिती होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT