कोकण

जिल्हा पोलिस दलातर्फे राइडस् अॅप विकसित

CD

एआयच्या जोरावर पोलिस तपासात क्रांती
‘राइडस् अॅप’; पाच जिल्ह्यांना मार्गदर्शक, विद्रूप मृतदेह ओळखणे, फरार शोधणे सोपे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः रत्नागिरी पोलिसदलाने गुन्हे तपासात आधुनिक तंत्राचा वापर करून ‘राइडस् अॅप’ विकसित करून संपूर्ण महाराष्ट्र पोलिसदलासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. या अॅपची निर्मिती १५ डिसेंबर २०२५ ला करण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित राइडस् अॅपमुळे आता विद्रूप झालेले मृतदेह ओळखणे आणि फरार आरोपींचा शोध घेणे अत्यंत सोपे झाले आहे. रत्नागिरी पोलिसांनी विकसित केलेले हे तंत्रज्ञान आता राज्यातील इतर पाच जिल्ह्यांसाठीही मार्गदर्शक ठरत आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हे विशेष राइड्स् अॅप विकसित करण्यात आले. या अॅपच्या कार्यप्रणालीत हे अॅप केवळ साधे सॉफ्टवेअर नसून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय)च्या साहाय्याने गुंतागुंतीचे गुन्ह्यांचा तपास करण्यास मदत करते तसेच फरार गुन्हेगार तसेच हरवलेल्या व्यक्तींचे जुने किंवा अस्पष्ट फोटो तब्बल १०८ वेगवेगळ्या अत्याधुनिक तांत्रिक पद्धतीने पुन्हा तयार केले जातात. यामुळे संशयितांचा सध्याचा चेहरा कसा असू शकतो, याचा अचूक अंदाज येतो.
रत्नागिरी जिल्हा पोलिसदलाने निर्माण केलेल्या या तंत्रज्ञानाची उपयुक्तता पाहून आता नागपूर, सातारा, पालघर आणि अहिल्यानगर या जिल्हा पोलिसदलांनी त्याचा वापर सुरू केला आहे. या जिल्ह्यांनीदेखील अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आणि रेखाचित्राच्या पुननिर्मितीसाठी राईडस अॅप (Raids App)ची मदत घेतली असून, त्यांना यात मोठे यश मिळाले आहे.
----
ओळख पटवून तपासाला वेग
अनेकदा अपघातात किंवा गुन्ह्यामध्ये मृतदेहाचा चेहरा विद्रूप होतो. त्यामुळे ओळख पटवणे कठीण जाते. राईडस् अॅप अशा विद्रूप चेहऱ्याचे डिजिटल पुननिर्माण करते ज्यामुळे संबंधित व्यक्तींची ओळख पटवून तपासाला वेग मिळतो. गुन्हेगारांच्या जुन्या रेखाचित्रांना वास्तविक फोटोमध्ये रूपांतरित करण्याची क्षमता या अॅपमध्ये आहे.
---
कोट..
आधुनिक काळातील गुन्हेगारांचा मागोवा घेण्यासाठी पारंपारिक पद्धतीसोबतच तंत्रज्ञानाची जोड असणे आवश्यक आहे. राईडस् अॅपमुळे तपासातील मानवी त्रुटी कमी झाल्या असून, अचूकता वाढली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा हा प्रयोग तंत्रज्ञान आणि कायदा अंमलबजावणी यांच्यातील एक उत्तम समन्वय मानला जात आहे. महाराष्ट्र पोलिसदलातील गुन्हे तपासयंत्रणेला तांत्रिकदृष्ट्या सक्षम करणे, हा यामागचा उद्देश आहे.
- नितीन बगाटे
जिल्हा पोलिस अधीक्षक-रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT