कोकण

गुहागरमध्ये आजपासून ''कासव महोत्सव'' सुरू

CD

rat1p16.jpg -
34712
गुहागर - किनारी कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले.

गुहागरमध्ये आजपासून
‘कासव महोत्सव’ सुरू
पर्यटकांचा प्रतिसाद ; १८६ घरटी संरक्षित
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १ : निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या ‘ऑलिव्ह रिडले’ कासव महोत्सवाला गुहागरमधील पिंपळादेवी बीच (वरचापाट) येथे आजपासून उत्साहात सुरुवात झाली. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पर्यटकांनी मोठा प्रतिसाद दिला असून, संपूर्ण एप्रिलमध्ये या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील रामेश्वर स्मशानभूमी ते बाग या परिसरात ऑलिव्ह रिडले कासवांचे मोठ्या प्रमाणावर संवर्धन केले जाते. यावर्षी गुहागरमध्ये तब्बल १८६ घरटी संरक्षित केली असून, हा आकडा गेल्या दोन वर्षांतील महाराष्ट्रातील सर्वाधिक घरट्यांपैकी एक आहे. या संवर्धन केंद्रांतून दररोज सकाळी कासवांची पिल्ले समुद्रात सोडली जातात. महाराष्ट्रातील सर्वांत लांब आणि सुंदर समुद्रकिनारा लाभलेल्या गुहागरमध्ये कासवांचे संवर्धन प्रभावीपणे होत आहे. निसर्गाचा हा अनोखा आविष्कार पर्यटकांना प्रत्यक्ष पाहता यावा, वनविभागाच्या ‘शेड्युल १’ श्रेणीतील या कासवांच्या जीवनचक्राची माहिती मिळावी आणि स्थानिक पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने कांदळवन कक्ष व गुहागर नगरपंचायतीच्या वतीने हा महोत्सव भरवण्यात आला आहे. कासवांचा हा जीवनप्रवास अनुभवण्यासाठी पर्यटकांनी दररोज सकाळी ६:३० वाजता किनाऱ्यावर उपस्थित राहावे, असे आवाहन नगरपंचायत आणि वनविभागामार्फत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT