मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा दिलासा
उपचारासाठी १०३ रुग्णांना; ७३ लाखांची मदत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : रत्नागिरीतील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सर्वसामान्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. गंभीर आणि दुर्धर आजारांशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी हा कक्ष नवसंजीवनी ठरत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील या कक्षाच्या प्रभावी कामगिरीमुळे गेल्या काही काळात प्राप्त झालेल्या १५१ अर्जांपैकी १०३ रुग्णांना प्रत्यक्ष ७३ लाख रुपयांचा लाभ मिळवून देण्यात यश आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून अनेक रुग्ण हृदयविकार, कर्करोग आणि इतर गंभीर शस्त्रक्रियांसाठी मुंबई, पुणे किंवा कोल्हापूरसारख्या शहरात जातात. अशा वेळी होणारा उपचारांचा खर्च सामान्य कुटुंबाच्या आवाक्याबाहेर असतो; परंतु शासनाने अशा गरजूंच्या आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची स्थापना केली आहे. नातेवाइकांवरील हा आर्थिक भार कमी करण्यासाठी हा कक्ष अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या तीन आठवड्यांतच चार गंभीर रुग्णांना प्रत्येकी १ लाख याप्रमाणे चार लाख रुपयांची तातडीची मदत सुपूर्द करण्यात आली आहे.
रुग्णांचे आजारानुसार वर्गीकरण करून त्यांना मदत देण्यात आली आहे. यात ३१ रुग्णांना प्रती १ लाख रुपयांप्रमाणे ३१ लाख, ४५ रुग्णांना ५० हजार रुपयेप्रमाणे २२ लाख ५० हजार रुपये, ४ रुग्णांना ७५ हजार रुपयांप्रमाणे ३ लाख, २ रुग्णांना २ लाख रुपयांप्रमाणे ४ लाख, ४ रुग्णांना ८० हजार रुपये प्रमाणे ३ लाख २० हजार, ६ रुग्णांना ७० हजाराप्रमाणे ४ लाख २० हजार, इतर १० रुग्णांना ३० हजार ते ९० हजाराप्रमाणे ५ लाख १० हजार अशा एकूण १०३ रुग्णांना ७३ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. मागील तीन आठवड्यात ४ रुग्णांना तातडीची मदत केली गेली. चार गंभीर रुग्णांना ४ लाख रुपयांची मदत सुपूर्द करण्यात आली आहे. उर्वरित चार रुग्णांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आले असून, त्यांनाही लवकरच आर्थिक साहाय्य मिळेल, असा विश्वास कक्षाकडून व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील हा कक्ष लोकाभिमुख करण्याचे काम डॉ. जिज्ञा लाखाटे, अनिता पवार, अमित कोरगांवकर आणि राजेश आंबेकर हे पाहात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.