कोकण

महेश काळेंची रसिकांवर ‘स्वरमोहिनी’

CD

35467

महेश काळेंची रसिकांवर ‘स्वरमोहिनी’

नेरुरमधील ‘स्वरसंध्या’; जिल्ह्यात प्रथमच शास्त्रीय गायन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ ः गायक पंडित महेश काळे यांचा ‘स्वरसंध्या’ हा स्वरसोहळा नेरुर येथील श्री देव कलेश्वर मंदिरात रंगला.  सुरेल तानांची बरसात, वाद्यांची लाभलेली समर्थ साथ आणि मंत्रमुग्ध झालेल्या रसिकांच्या टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रसाद यामुळे हा सुरमय सोहळा सांगीतिक विश्वात न्हाऊन निघाला.
नेरुर येथील श्री देव कलेश्वर मंदिरात पंडित महेश काळे यांचा ‘स्वरसंध्या’ आणि प्रथम मानकऱ्यांची वसंत पूजा सोहळा मतकरी कुटुंबीय, शिरसोसवाडी यांच्या वतीने पार पडला. यावेळी श्री देव कलेश्वर महाराजांच्या दरबारात हनुमान जन्म दिनापासून वसंत पूजा केली जाते. यानिमित्त शुक्रवारी (ता. ३) ‘स्वरसंध्या’ ही संगीतमय सुरेल मैफिल श्री देव कलेश्वर मंदिराच्या रंगमंचावर आयोजित केली होती. मैफलीचा प्रारंभ शास्त्रीय श्री. काळे यांनी ‘शिवरंजींनी’ रागातील भगवान शिव यांच्या पूजेचे आणि त्यांच्या रुपाचे वर्णन करणाऱ्या ‘महादेव’ या बंदिशीने केला. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील गाजलेले ‘सूर निरागस हो’ हे गीत, ‘दिगंबरा दिगंबरा’ जयघोषात ‘दत्त नामाचा करूनी गजर’ हे भक्तीगीत रसिक मनाचे ठाव घेणारे ठरले. स्वतः लिहून स्वरबद्ध केलेले श्री राम यांच्यावरील गीत सादर करत रामभक्ती जाज्वल केली. ‘राग’, ‘यमन’ आणि ‘केहरवा’ तालातील पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांनी गायलेले ‘शब्दांवाचून कळले सारे’ हे भावगीत स्वतःच्या वेगळ्या शैलीत गाताना रसिकांना मंत्रमुग्ध केले. गीतकार कुसुमाग्रज आणि गायक तथा संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे ‘हे सुरानो चंद्र व्हा’ या गाण्यातील भाव गायिकीतून त्यांनी अधिक गडद केले. शेवटी संत चोखामेळा यांचा ‘कानडा राजा पंढरीचा’ हा अभंग सादर करत मैफलीचा शेवट केला.
कार्यक्रमाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. जिल्ह्यात पहिल्यांदाच शास्त्रीय गायक महेश काळे यांचा संगीत कार्यक्रम होत असल्याने सिंधुदुर्गसह रत्नागिरी, कोल्हापूर, गोवा आदी भागातून हजारो प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवली.
....................
भारतीय कला, संस्कृती जपा
प्रत्येकाने राम नामाचा जप करावा. भारतीय संस्कृती ही विविध कलांनी समृद्ध असून ती जपण्याचे काम सर्वांनी करावे, असे आवाहन यावेळी पंडित महेश काळे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT