कोकण

कणकवली येथे शुक्रवारी सोनू निगम यांचा कार्यक्रम

CD

35739

कणकवली येथे शुक्रवारी
सोनू निगम यांचा कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ६ ः माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे यांचा शुक्रवारी (ता. १०) ७४ वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्त जिल्हावासीयांनी अमृत महोत्सवी वर्ष स्वागत समिती स्थापन केली आहे. समितीतर्फे ७४ व्या वाढदिवसापासून अमृत महोत्सव अर्थात ७५ व्या वाढदिवसापर्यंत वर्षभर विविध उपक्रम राबवून हे अमृत महोत्सवी वर्ष यादगार बनविण्याचे निश्चित केले आहे.
कणकवली उपजिल्हा रुग्णालय पटांगणावर शुक्रवारी (ता. १०) वाढदिवस कार्यक्रम होणार असून त्यानंतर प्रसिद्ध गायक सोनू निगम यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी मान्यवर, नेत्यांच्या उपस्थितीत नारायण राणे यांचा वाढदिवस थाटात साजरा होणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, हितचिंतक तसेच जिल्हावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागत समितीतर्फे करण्यात आले आहे. खासदार राणे यांना शुभेच्छा देताना पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तक स्वरुपात भेट स्वीकारण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जेणेकरून भेटीद्वारे संकलित पुस्तकांचे वितरण जिल्ह्यातील ग्रंथालयांना करण्यात येवून जिल्ह्यात वाचक चळवळ वृद्धिंगत होण्यास हातभार लागेल. या वाढदिवसापासून १० एप्रिल २०२७ पर्यंत वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

French Open 2026: २५ व्या ग्रँडस्लॅमसाठी नोवाक जोकोविचचा महासंघर्ष! २ तास ५१ मिनिटांच्या थरारात कसाबसा मिळवला विजय!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २६ मे २०२६

ढिंग टांग : मार्को रुबियो रिपोर्ट..!

जीवनमान-जीवनभान : संजीवनी देणारी ‘सीपीआर’ पद्धत

RCB vs GT Qualifier 1: RCB सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये जाणार? गुजरात टायटन्सशी आज ‘क्वालिफायर वन’ लढत धरमशालामध्ये रंगणार

SCROLL FOR NEXT