कोकण

तेरवणमध्ये सापडले वैशिष्ट्यपूर्ण ‘रामलिंग’ एकाश्म लेणी

CD

-rat7p12.jpg-
26O35848
राजापूर ः रामलिंग एकाश्म लेणी.
-rat7p13.jpg
26O35849
ः लेण्यातील गर्भागृह
----
तेरवणमध्ये ‘रामलिंग’ लेणीचा शोध
एकाश्म रचना, दुहेरी गर्भगृहे; वाकाटककालीन असण्याची शक्यता
तेरवणमध्ये सापडले वैशिष्ट्यपूर्ण ‘रामलिंग’ एकाश्म लेणी
लेण्यात दोन गर्भगृहे; विदर्भातील भटाळा येथील लेणीशी साधर्म्य
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ७ ः तालुक्यातील तेरवण गावाजवळ निसर्गरम्य परिसरात एकाच खडकातून कोरलेले वैशिष्ट्यपूर्ण ‘रामलिंग’ लेणी मंदिर आढळून आले आहे. दुहेरी गर्भगृहे, देवकोष्टे आणि बांधीव तळ्यामुळे या लेणीचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होत आहे. या वैशिष्ट्यपूर्ण रामलिंग लेणीची रचना विदर्भातील भटाळा (जि. चंद्रपूर) येथील लेणीशी असलेले साधर्म्य दिसून येत आहे. त्यामुळे तेरवण येथील रामलिंग लेणी वाकाटककालीन असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजापूर तालुक्यातील तेरवण येथे एकाश्म स्वरूपातील प्राचीन लेणी मंदिराचा शोध लागला असून, त्याची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकाच खडकातून कोरलेल्या या लेण्यात दोन गर्भगृहे असून, ती आतून परस्परांना जोडलेली आहेत. एका गर्भगृहात अधिष्ठान कोरलेले असून, दुसरे गर्भगृह रिक्त अवस्थेत आहे. लेणीसमोर बांधीव तळे तसेच परिसरात देवकोष्टेही आढळून येतात.
स्थानिक ग्रामस्थ या ठिकाणाला ‘रामलिंग’ म्हणून ओळखतात आणि येथे नियमित पूजाअर्चा केली जाते. या लेणीची रचना विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळा येथील लेण्यांशी साधर्म्य दर्शवत असल्याने हे लेणी वाकाटककालीन असण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे. पुणे येथील इतिहास अभ्यासक अनिल दुधाणे, अभ्यासक विनोद पवार तसेच स्थानिक ग्रामस्थ प्रकाश जोग यांनी नुकतीच या परिसराला भेट देत लेणी, गर्भगृहे, देवकोष्टे आणि तळ्याची पाहणी करून प्राथमिक निरीक्षण नोंदवले. निसर्गरम्य वातावरणात असलेला हा ऐतिहासिक वारसा अद्याप शासकीय स्तरावर संरक्षित किंवा संवर्धित झालेला नाही. या लेणीचा शास्त्रीय अभ्यास झाल्यास कोकणाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---
कोट ः
तेरवण येथील रामलिंग लेण्यांचे भटाळा येथील लेण्यांशी साम्य दिसून येत आहे. त्यामुळे तेरवण येथील रामलिंग लेणीही वाकाटककालीन असण्याची शक्यता दिसत आहे.
---अनिल दुधाणे, इतिहास अभ्यासक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डिझेलचा भडका, एसटीच्या तिकीट दराचे काय? परिवहन मंत्री म्हणाले, महामंडळाला तोटा होतोय, सध्या...

Ambenali Accident: आंबेनळी ठरतोय मृत्यूचा घाट, ८ वर्षांपूर्वी झालेला ३३ जणांचा मृत्यू; गेल्या तीन महिन्यात तिसरी दुर्घटना

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Latest Marathi News Live Update : अर्जुन खोतकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

Blackmail case: महिलेसोबतच्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल, बँक कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; ६ जणांवर गुन्हा, चौघांना अटक

SCROLL FOR NEXT