कोकण

कांदळगाव येथे शनिवारी ''सिंधुदुर्ग श्री २०२६'' स्पर्धा

CD

कांदळगाव येथे शनिवारी
‘सिंधुदुर्ग श्री २०२६’ स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ८ : सिंधुदुर्ग जिल्हा बॉडी बिल्डर असोसिएशनच्या मान्यतेने व बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट मुंबई संस्थापकीय अध्यक्ष दिनकरराव दौलतराव राणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ शनिवारी (ता. ११) सायंकाळी ६.३० वाजता रोजी कांदळगाव श्री रामेश्वर मंदिर परिसर येथे रौप्य महोत्सवी ‘सिंधुदुर्ग श्री २०२६’ या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटन कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उद्योजक दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, मसुरे एज्युकेशन सोसायटी चेअरमन तथा उद्योजक दीपक परब, जिल्हा बँक संचालक संदीप उर्फ बाबा परब, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, कांदळगाव सरपंच रणजित परब उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेचे खास आकर्षण अफरोझ खान व संतान फर्नांडिस, सुपर सॅम यांचा बॉडी बिल्डिंग शो होणार आहे. या स्पर्धेला उपस्थित राहावे, असे आवाहन बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष नंदकुमार राणे, बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट मुंबई सचिव नारायण चव्हाण, सिंधुदुर्ग बॉडीबिल्डर असोसिएशनचे सचिव किशोर सोन्सुरकर, बेस्ट शिव हनुमान व्यायामशाळा अध्यक्ष उमेश कोदे, सचिव प्रवीण पारकर, खजिनदार महेश परब तसेच कांदळगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ceasefire: इस्रायलकडून बेरूतवर मोठा हवाई हल्ला; ८० जणांचा मृत्यू, १०० लोक जखमी, इराणकडून होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांवर बंदी

Shaktipeeth Highway On Raju Shetti : शक्तिपीठ महामार्गाच्या नवीन नकाशाला राजू शेट्टींचा विरोध, सांगली, कोल्हापुरातून पुन्हा आंदोलन पेटणार

MPSC Success Suraiya Desai : संसार सांभाळत स्पर्धा परीक्षेत यश; कोल्हापुरची सुरैया देसाईं महिलांमध्ये राज्यात प्रथम

Pune water supply news: पुण्यात १५ टक्के पाणी कपात टाळण्यासाठी गळती रोखण्याचा महापालिकेचा प्रयत्न; समान पाणी पुरवठा योजना व स्मार्ट मीटरवर भर

Mehkar Lonigavli POCSO Case: लोणी गवळी शाळेत तिसरीतील मुलींचा विनयभंग करणारा मास्तर ग्रामस्थांच्या ताब्यातून पोलिसांच्या स्वाधीन; जिल्ह्यात संतापाची लाट

SCROLL FOR NEXT