कोकण

काजू चोरी प्रकरणाचा व्यापाऱ्यांना त्रास नको

CD

swt89.jpg
36112
सिंधुदुर्गनगरी : काजू चोरी प्रकरणी जिल्ह्यातील काजू व्यापाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांची भेट घेतली.

काजू चोरी प्रकरणाचा व्यापाऱ्यांना त्रास नको
संघटनेची मागणी : जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांची भेट
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ : जिल्ह्यात काजू चोरी प्रकरणी अनेक वर्षे काजू उद्योग करणाऱ्या स्थानिक उद्योजकांची पोलिस चौकशी करीत आहेत. याप्रकरणी जिल्ह्यातील काजू व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. याप्रकरणी व्यापाऱ्यांना नाहक त्रास न देण्याची मागणी त्यांनी केली.
गेल्या आठवडाभर जिल्ह्यात काजू चोरीच्या मालवण, बांदा व कुडाळ याठिकाणी घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील काही वर्ष अतिशय प्रामाणिकपणे हा काजू उद्योग करणारे उद्योजक आहेत त्यांनी हा काजू खरेदी केला म्हणून पोलिसांनी जणू काजू खरेदी करणारेच गुन्हेगार आहेत, अशा प्रकारची भूमिका घेतली आहे. यामुळे व्यापाऱ्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. या अनुषंगाने आज महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन व कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मालवणमधील काजू उद्योजक सुरेश नेरूरकर हे गेल्या पंचवीस वर्षाहून जास्त काळ या काजू उद्योगात असून या उद्योगाला जे जी.आय.नामांकन मिळालेले आहे यात त्यांचे फार मोठे योगदान आहे. देशाचे तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही झालेला असून काजू प्रक्रिया उद्योगातील ते एक यशस्वी व प्रतिष्ठित उद्योजक आहेत. असे असुनही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून जी अपमानास्पद वागणूक दिली याबाबत या दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली आहे. अशा पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी केलेली आहे. या घटनेमुळे या जिल्ह्यातील छोट्या मोठ्या काजू व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण असून याबाबत पोलिस प्रशासनाने आश्वासक वातावरण निर्माण करावे अशी विनंती या प्रसंगी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र काजू असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, सचिव बिपिन वरसकर, कुडाळ एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, सचिव नकुल पार्सेकर, सहसचिव कुणाल वरसकर, गणेश काजूचे मालक, सुरेश नेरुरकर, अभिषेक नेरुरकर, रामगड सरपंच शुभम माठकर, तेली समाजाचे माजी अध्यक्ष एकनाथ तेली, जिल्हा परिषद सदस्य अनिल कांदळगावकर, प्रमोद भोगटे, भाऊ राणे, उदय केसरकर, भाऊ वळंजू आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT