कोकण

देवरुख आगाराच्या प्रश्नांसाठी आज तातडीची बैठक

CD

‘सकाळ’ बातमीचा परिणाम---लोगो
(मंगळवारी टुडे १ मधील बातमीचे कात्रण वापरावे)
देवरूख आगार प्रश्नांवर आज बैठक
पालकमंत्र्यांकडून दखल : समस्या लागणार मार्गी
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. ८ ः देवरूख बसस्थानक आणि आगाराची दूरवस्था, बसेसची कमतरता आणि रिक्त पदे या समस्या मार्गी लावण्याबाबत पालकमंत्री उदय सामंत गुरूवारी (ता. ९) रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहेत. या बसस्थानकातील समस्यांबाबत ‘सकाळ’ने बुधवारी (ता. ८) वृत्तामधून प्रकाश टाकला होता. त्याची दखल घेत ही बैठक होणार आहे.
काही दिवसांपूर्वीच महायुतीचे पदाधिकारी, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन देवरूखसाठी नवीन बसेसची मागणी केली होती. ‘सकाळ’ने देवरूख आगाराच्या दुरवस्थेबाबत सचित्र वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताचा फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचला. त्याची दखल घेत ही तातडीची बैठक घेण्यात येणार आहे. देवरुख आगारासाठी जास्तीत जास्त नवीन गाड्या उपलब्ध करून देणे, बसस्थानक आणि आगाराची झालेली दुरवस्था सुधारणे, चालक, वाहक आणि मेकॅनिकल स्टाफच्या रिक्त जागा भरण्याबाबत निर्णय बैठकीत ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होणार आहे
---
कोट
देवरूख आगाराच्या समस्यांबाबत आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतोच. बुधवारी (ता. ८) ‘सकाळ’ने या प्रश्नाला वाचा फोडल्यामुळे पालकमंत्र्यांनी त्याची तातडीने दखल घेतली. या बैठकीतून देवरूखच्या प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी आशा आहे.
अभिजित शेट्ये, जिल्हाध्यक्ष, भाजप ओबीसी सेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT