कोकण

क्राईम

CD

दुचाकीची शिवशाहीला धडक ; दोघे गंभीर
रत्नागिरी ः शहरातील कुवारबाव येथील रेल्वेस्टेशनसमोर भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शिवशाही बसला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. रोहित राजू सावंत (वय २३) व साईल संतोष धोत्रे (वय २३, दोघेही रा. कुवारबाव-कातळवाडी, रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत. यातील स्वार साईल धोत्रे याला गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात मंगळवारी (ता. ७) रात्री झाला. रेल्वेस्टेशन समोरील रस्त्यावर एसटीची शिवशाही उभी होती. त्या वेळी धोत्रे हा दुचाकीने रोहित सावंत याला घेऊन येत होता. त्याचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी शिवशाहीवर पाठीमागून आदळली. याची नोंद जिल्हा रुग्णालयाच्या पोलिसचौकीत नोंद करण्यात आली आहे.

वाहतुकीस अडथळा; स्वाराविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील चर्मालय ते मारुती मंदिर जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुस्तकीम शफीक काझी (वय २०, रा. कोकणनगर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ७) रात्री पावणेआठच्या सुमारास चर्मालय ते मारुती मंदिर जाणाऱ्या रस्त्यावर घडली. संशयित काझी यांनी दुचाकी चर्मालय ते मारुती मंदिर जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांना अडथळा होईल, अशी उभी केली होती. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल शरद कांबळे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोटारीतून पडलेल्या तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी ः तालुक्यातील खानू-मठ येथे मोटारीतून रस्त्यावर पडलेल्या तरुणाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यास तपासून मृत घोषित केले. संकेत सुनील संसारे (वय ३०, रा. नाणीज, तळवाडी बाजारपेठ, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ७) दुपारी घडली. संकेत संसारे हा खानू-मठ येथे मोटारीतून रस्त्यावर पडल्याचा फोन संकेतचे चुलते अनिल विठोबा संसारे यांना आला. त्यानंतर ते घटनास्थळी गेले. त्यांनी त्याला पाली ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले. रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संकेतला तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT