कोकण

आणखी दोन एलईडी नौका पकडल्या

CD

swt97.jpg
36306
देवगड : गोवा व देवगड येथील एलईडी नौका मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेने पकडल्या.

आणखी दोन एलईडी नौका पकडल्या
मालवणजवळ कारवाई : समुद्रातील अतिक्रमण रोखण्यासाठी मोहीम
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ९ : मालवण समोरील समुद्रात गोवा व देवगड येथील एलईडी नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने धडक कारवाई केली असून नौका ताब्यात घेतल्या आहेत. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. या हंगामातील एलईडीविरोधातील ही दहावी कारवाई आहे.
सिंधुदुर्गाच्या सागरी हद्दीत एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या नौकांचे अतिक्रमण वाढले आहे. याचा थेट परिणाम पारंपरिक मासेमारीवर होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मत्स्य विभागाने कारवाई मोहीम हाती घेतली आहे. गेल्या आठवड्याभरात अशा नौकांवर कारवाईचा बडगा उगारूनही हे अतिक्रमण सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर येथील समुद्रात संयुक्त गस्तीत एलईडी मासेमारी करणाऱ्या दोन नौका जप्त केल्यामुळे अवैध एलईडी मासेमारीविरुद्ध विभागाची कठोर भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. मागील आठवड्यात देखील गोवा आणि रत्नागिरी येथील नौकांवर कारवाई करण्यात आली आहे. सध्याच्या हंगामात ही एलईडी मासेमारीविरुद्धची दहावी मोठी यशस्वी कारवाई आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी प्रतीक महाडवाला, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, सिंधुदुर्ग, कि. वाघमारे, परवाना अधिकारी, देवगड व ग. शं. टेमकर, परवाना अधिकारी, मालवण हे काल रात्री (ता.८) मालवण समोर समुद्रात नियमित गस्त घालत होते. यावेळी देवगड येथील परवाना असलेली नौका चित्रा-१ नों. क्र.- आयएनडी- एम एच- ५ एमएम- ६८५ व अक्राजे नों. क्र.- आयएनडी- जीए -१ एमएम- ३९६२ द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण समोर अनधिकृतरित्या एलईडी लाईट व्दारे मासेमारी करत असताना पकडले. या दोन्ही नौकांवर नौका तांडेलसह एकूण अंदाजे ३५-४० खलाशी आहेत. या नौका जप्त करून देवगड बंदरात ठेवण्यात आल्या आहेत. नौकेवरील एलईडी लाईट सामग्री जप्त करण्यात आली आहे.

चौकट
वारा, उंचच उंच लाटा उसळत असतानाही धाडस
एलईडी फिशिंग रात्रीच्या वेळी चालते. काल गस्ती पथकाने समुद्रात प्रवेश केला तेव्हा वारा वाढला होता. उंचच उंच लाटा उसळत होत्या. अशा थरारक स्थितीतही दोन नौका पकडण्यात पथकाला यश आले. अधिकारी महाडवाला यांच्यासह परवाना अधिकारी, मालवण यांच्या पथकाने सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक मालवण व देवगड यांचे सहकार्याने सागर कुवेसकर, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे.


चौकट
बंदी असतानाही मासेमारी सुरू कशी?
जिल्ह्याच्या सागरी हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणात एलईडी धारकांकडून मासळीची लूट केली जात आहे. मत्स्यव्यवसाय विभागाकडून या मासेमारीवर कडक कारवाई करत नौका जप्त करण्याची कार्यवाही केली जात आहे. मात्र, केंद्र व राज्य शासनाची एलईडी मासेमारीला बंदी असताना जिल्ह्याच्या सागरी हद्दीत ही मासेमारी कशी सुरू आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs LSG Live: अजिंक्य रहाणेच्या मेहनतीवर सहकाऱ्यांनी फिरवले पाणी; लखनौला दिली पुनरागमनाची संधी, कोलकातात मोठा ड्रामा

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर आग; शॉर्टसर्किटमुळे घटना घडल्याचा अंदाज

KKR vs LSG Live: चर्चा तर होणारच... अजिंक्य रहाणेचा अतरंगी Six! रिषभ पंतच्या मास्टरस्ट्रोकने LSG ला विकेट मिळवून दिली Video Viral

High Court on TET : अल्पसंख्याक शाळांमध्ये टीईटी बंधनकारक नाही; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण, शिक्षकांना दिलासा

119 इंच कंबर आणि 545 किलो वजन... 9 वर्षे अंथरुणाला खिळलेला, हा जगातील सर्वात मोठी कंबर असलेला माणूस

SCROLL FOR NEXT