कोकण

लेव्हल-३ तायक्वॉंदो रोलिंग मॅट'' लांज्यात

CD

लांज्यात तायक्वांदोला नवे बळ
‘लेव्हल-३’ मॅट उपलब्ध ; देशात पहिली
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १० ः देशातील पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘लेव्हल-३ तायक्वांदो रोलिंग मॅट’ लांज्या तालुक्याला उपलब्ध झाली आहे. या अत्याधुनिक मॅटचे उद्‍घाटन लांजा येथील शासकीय विश्रामगृहात आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता असूनही त्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा व क्रीडा साहित्याअभावी संघर्ष करावा लागतो, ही उणीव ओळखून आमदार किरण सामंत यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांतून भारतामध्ये प्रथमच अशा प्रकारची ‘लेव्हल-३’ मॅट लांजात दाखल झाली असून, यामुळे जिल्ह्याच्या क्रीडावैभवात मोलाची भर पडली आहे. आता लांज्यातील खेळाडूंना प्रत्यक्ष ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मॅटवर सराव करता येणार आहे. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे, तायक्वांदो फिटनेस अॅकॅडमीचे अध्यक्ष किशोर यादव, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील कुरूप, तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, जिल्हा बँकेचे संचालक महेश खामकर, राष्ट्रीय पंच व प्रशिक्षिका तेजस्विनी आचरेकर यांच्यासह खेळाडू आणि पालक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sapkal Baramati : 'उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर...', हर्षवर्धन सपकाळांचा पवारांच्या बालेकिल्ल्यात इशारा

RR vs RCB Weather Update: विराट कोहली- वैभव सूर्यवंशी, संघर्षावर पावसाचं सावट; RR ने MIला जसे धुतले, तसेच RCBला चोपावे लागणार

Shirol Accident news : आठ दिवसात ३ वेळा नशीबाची साथ, पण नियतीच्या मनात वेगळचं होतं, शिरोळचा आकाश अपघातातच गेला

Latest Marathi News Live Update : TVK प्रमुख आणि अभिनेता विजय कराईकुडी येथे निवडणूक प्रचार करत आहेत

Khaby Lame Divorce: नंबर 1 टिकटॉकरचा घटस्फोट चर्चेत! 20 मिलियन डॉलर संपत्ती, पण मालकी कुणाची? नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT