धामापुरात कर्करोग तपासणी
लाभार्थींची उपस्थिती; कॅन्सर डायग्नॉस्टिक व्हॅन दाखल
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. १० ः ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलत देवरूखजवळील धामापूर प्राथमिक आरोग्यकेंद्रात विशेष ‘कर्करोग तपासणी व उपचार शिबिर’ पार पडले. या शिबिरात परिसरातील ८७ महिलांनी सहभाग नोंदवून आपल्या आरोग्याप्रति जागरूकता दाखवली.
ग्रामीण भागातील महिलांना कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे प्राथमिक स्तरावर निदान व्हावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आणि संगमेश्वर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर राबवण्यात आले. या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जगताप यांच्या सहकार्याने रत्नागिरी-कोल्हापूर परिमंडळांतर्गत असलेली ‘कॅन्सर डायग्नॉस्टिक व्हॅन’ या शिबिरासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती.
या शिबिराचे उद्घाटन धामापूर पंचायत समितीच्या नूतन सदस्या दूर्वा पाष्टे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ग्रामीण रुग्णालय देवरूख आणि डॉ. वालावलकर हॉस्पिटल (डेरवण) येथील तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने महिलांची सखोल तपासणी केली. आरोग्यकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती वाजे, डॉ. श्वेता पवार आणि देवरूख ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. नाईक यांनी प्रत्यक्ष तपासणीत महत्त्वाची भूमिका बजावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.