चिपळुणात २५ पासून विद्यार्थी संमेलन
चिपळूण, ता. १० ः येथील चतुरंग प्रतिष्ठानच्यावतीने येत्या २५ आणि २६ एप्रिल रोजी शहरात ‘कोकण अभ्यासवर्ग विद्यार्थी संमेलन’ आयोजित केले आहे. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात होणाऱ्या या ऐतिहासिक संमेलनासाठी राष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रांतील दिग्गजांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती चतुरंग प्रतिष्ठानचे विद्याधर निमकर यांनी दिली. संमेलनाचे उद्घाटन २५ एप्रिल रोजी सकाळी १० वा. ‘चाणक्य मंडळ’चे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते होईल. या संमेलनाचे अध्यक्षपद यूजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन भूषवणार आहेत. कोकणात गेल्या ३० वर्षांपासून सुरू असलेल्या अभ्यासवर्गातील विद्यार्थी, ‘निर्धार’ वर्गातील विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांना एका व्यासपिठावर आणण्यासाठी या संमेलनाचे आयोजन केले आहे. २५ रोजी सकाळी १० वा. उद्घाटन, ११ वा. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची ‘पोखरण अणुचाचणी’ विषयावर आदित्य शिंदे मुलाखत, दुपारी २ वा. माजी न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांचे ‘दिल विल प्यार व्यार’ (तरुणपण ः घसरणारं आणि सावरणारं) या विषयावर व्याख्यान, ३ वा. विद्यार्थी परस्पर संवाद आणि परिचय. सायं. ५ वा. एआयतज्ज्ञ डॉ. भूषण केळकर यांचे मार्गदर्शन होईल. २६ ला सकाळी ८ डॉ. प्रसाद देवधर यांचे ‘माझे आणि कोकणचे नाते’ विषयावर मार्गदर्शन, १० वा. ''थेट सहवास व संवाद'' सत्रात डॉ. तात्याराव लहाने, डॉ. भूषण केळकर, उद्योजक डॉ. विठ्ठल कामत, अर्थतज्ज्ञ दीपक करंदीकर, डॉ. सागर देशपांडे, जगदीश इंदुलकर आणि सुचेता ढवाळकर उपस्थितांशी संवाद साधतील. दुपारी २ वा. माजी एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांची ''राष्ट्रीय सुरक्षा आणि आपण सारे'' विषयावर मुलाखत, ३.३० वा. संमेलनाचा समारोप होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.