

Mumbai Metro Line 10 Pod Taxi
ESakal
मुंबई महानगर प्रदेशातील रहिवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एमएमआर प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतुकीच्या पर्यायी साधनांवर भर दिला जात आहे. मीरा-भयंदरमधील दहिसर ते काशीगाव मेट्रो लाईन सुरू झाल्यानंतर, आता ठाणे ते मीरा-भायंदरपर्यंत मेट्रो जोडणीला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ठाणे-मीरा-भयंदर परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने गायमुख रेतीबंदर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मेट्रो १० प्रकल्पाची योजना आखली आहे.