कोकण

ध्यानधारणा, योग यावर विश्वास बसला

CD

rat15p3.jpg-
37452
डॉ. शरद प्रभूदेसाई

परिवर्तन - लोगो

इंट्रो
मामाकडचे वातावरण अधिक भक्तिमय आणि सश्रद्ध होते. देवपूजा स्तोत्र इत्यादीबाबत मामा आणि मावशी काकांच्या मानाने अधिक भावूक होते. आजीची पूजा अधिक भक्तिमय होती. लहान मामा आणि मावशी यांनी स्वामी स्वरूपानंदांची दीक्षा घेतली होती. रोज ते पसायदान आणि ज्ञानेश्‍वरी नित्यपाठ (ज्ञानेश्‍वरीतील निवडक एकशे आठ ओव्या) न चुकता म्हणत. या ओव्या ऐकायला गोड वाटत. त्या ओव्या ऐकून ऐकून श्रीने पाठ केल्या. एकूण मामाकडील भक्तिमय वातावरण श्रीला मनापासून आवडत होते. त्यामुळे श्रीची भक्तीची ओढ द्विगुणित झाली. काकांकडे पाठ केलेले गीतेचे अध्याय आणि या ओव्या तोही दररोज न चुकता म्हणत, असे या ओव्यांचा किंवा गीतेच्या अध्यायातील श्‍लोकांचा त्याला अर्थ येत नव्हता.
- डॉ. शरद प्रभूदेसाई, रत्नागिरी

ध्यानधारणा, योग यावर विश्वास बसला

एक गोष्ट महत्वाची म्हणजे मामाकडे श्रीने काय करावे याबाबत कोणीच आग्रही नव्हते. त्याने देवपूजाअर्चा कशाप्रकारे करावी याबाबतही बंधन नव्हते. थोडक्यात, याबाबत घरातील वातावरण मोकळे होते. श्रीची देवभक्ती एकट्याने चालू असे. इतर ठिकाणच्या तुलनेत मामाकडे सोवळेओवळे आणि इतर देवभक्तीत दिसणारी कर्मकांडे दिसत नव्हती. मामाचा स्वच्छतेवर अधिक भर होता. देवाला नमस्कार करण्याआधी हातपाय आणि अंग धुवून शुचिर्भूत होण्यावर भर होता. त्यामुळे श्रीलाही या सर्व गोष्टींची सवय लागली. इतर ठिकाणी स्वच्छतेपेक्षा कर्मकांडावर भर असे. मामाकडेही दरवर्षी सत्यनारायणाची पूजा होत असे. मामाचे खास भटजी होते. त्यांना वेळ असेल तेव्हाच पूजा होत असे. सत्यनारायण मामा अतिशय श्रद्धेने करत असे. त्याबाबत कोणतीही कुचराई चालत नसे. गुरूजी योग्यप्रकारे पूजा सांगताहेत का, यावरही मामाचे लक्ष असे. अशी ही सत्यनारायणाची पूजा अनेक वर्षे चालू होती; पण एकदा कामाच्या व्यापामुळे या भटजींनी पूजा उरकून टाकली, असे मामाचे म्हणणे पडले. आपली श्रद्धा पायदळी तुडवली गेली, असा मामाचा ग्रह झाला. असे झाल्याने पूजा करू नये, असे मामाचे मत झाले. त्यामुळे दरसाल होणारी पूजा बंद झाली. पूजा बंद झल्याने श्री थोडा नाराज झाला.
श्री इंटरसायन्सची परीक्षा चांगल्या गुणांनी पास झाला. त्याला वैद्यकीय म्हणजेच एमबीबीएसला प्रवेश मिळाला. इंटरसायन्सचा निकाल लागण्याचे आधी गावाहून येताना श्री नेहमीप्रमाणे सत्यनारायणाची पूजा करून आला. सत्यनारायणाच्या कृपेनेच बहुधा श्रीला या परीक्षेत उत्तम यश मिळाले आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला, याबाबत श्रीची खात्री झाली.
वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू झाला. वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष हाहा म्हणता संपलेही! पहिल्या वर्षाची परीक्षेत श्री पास झाला. दरम्यान, मामा मानसिकदृष्टया तणावग्रस्त झाला. हा मामा अत्यंत हुषार; पण थोडा तापट. आपल्या मताबाबत आग्रही. कुणाकडून काही चूक झाल्यास त्याचेवर वैतागायचा. थोडक्यात अतिटोकाचे वागणे! तसेच कामाचा तणाव. या सर्व गोष्टींमुळे त्याला मानसिक तणाव आला असावा. त्यासाठी त्याला रुग्णालयात दाखलही केले. त्याला अशक्तपणा जाणवत असल्याने शिरेतून ग्लुकोजही अनेकवेळा देण्यात आले. कोणत्याच औषधाने बरे वाटत नव्हते. सर्व तपासण्या झाल्या. कोणताही शारीरिक आजार मिळाला नाही. मग प्रत्येकजण आपापल्या कुवतीप्रमाणे सल्ला देऊ लागला. कोणी योगासने करायला सांगितली तर कोणी सत्पुरुषाची दीक्षा घ्यायला सांगितली. लहान मामा स्वामी स्वरूपानंदांचा अनुगृहित होताच. लहान मामाबरोबर हा मामा गावी जाऊन स्वामी स्वरूपानंदांची दीक्षा घेऊन आला. योगासने प्राणयाम चालू होताच आता त्याबरोबर ध्यानधारणा सुरू झाली. या सर्वांचा उत्तम परिणाम दिसून आला. मामाचा मानसिक तणाव हळूहळू कमी होऊ लागला. त्याला आत्मविश्‍वास वाटू लागला. दरम्यानच्या काळात मामाचा आत्मविश्‍वास इतका कमी झाला होता की, त्याला ऑफिसमध्ये जाताना कोणीतरी सोबती लागायचे. कुठेही एकटे जायला तो धजावत नसे. अशा या गंभीर मानसिक तणावाच्या अवस्थेतून ध्यानधारणा, योगासनामुळे बाहेर आला. आता त्याचे आयुष्य पूर्वपदावर आले. त्याला कामात रस वाटू लागला. त्याचा आत्मविश्‍वास पुन्हा मिळाला.
हे सर्व श्री अतिशय जवळून पाहात होता. त्यामुळे ध्यानधारणा आणि योग यावर त्याचा कमालीचा विश्वास बसला. वाचनाची फार आवड नसताना त्याला आध्यात्मिक पुस्तके वाचावी, असे वाटू लागले. त्याने योगसाधना आणि ध्यानधारणाबाबत त्याच्या कॉलेजमधील एका डॉक्टरांना शंका विचारण्याचे धाडस केले होते. गावाला गेल्यावर आपण स्वरूपानंदांचे दर्शन घ्यावे जमल्यास दीक्षाही घ्यावी, असे त्याला वाटू लागले. पहिल्या वर्षाची परीक्षा झाल्यावर तो गावाला गेला. आधी त्याने स्वरूपानंदांचे दर्शन घेतले. त्याला स्वरूपानंद होते त्या ठिकाणचे वातावरण आवडले. त्या वातावरणाने तो भारावून गेला. गावी आल्यावर नेहमी स्वामींच्या दर्शनाला जायचे त्याने मनाशी ठरवले. त्याप्रमाणे प्रत्येकवेळी गावाला गेल्यावर दर्शनाला जाऊ लागला. अशाप्रकारे एक-दोनवेळा स्वामींचे दर्शन त्याने घेतले; पण त्यानंतर स्वामींचे देहावसान झाल्याने त्याचे स्वामींची दीक्षा घेण्याचे स्वप्न अधुरे राहिले. त्याबाबत त्याच्या मनात कायम रूखरूख होती. हा ही स्वामींचा नित्यपाठ न चुकता म्हणू लागला. अर्थात् या नित्यपाठातील ओव्या त्याला तोंडपाठ होत्याच.

(लेखक बालरोगतज्ञ आणि चिंतनशील अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात ₹69,000 किमान वेतनासह जुनी पेन्शन योजनेचा प्रस्ताव

Petrol Diesel Rates update : पेट्रोल -डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका

खऱ्या आयुष्यातही सगळ्यांशी तुसडेपणाने वागतो समीर परांजपे; बायकोचा खुलासा, म्हणाली, 'आताची भूमिका सेम टू सेम'

Latest Marathi News Live Update: IT कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील मॅनेजर आणि HR अश्विनी चेनानीला कोर्टात आणलं

Mumbai News: ऑफिसच्या मीटिंगदरम्यान महिला सहकाऱ्याच्या स्तनांकडे पाहणे हा गुन्हा नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल

SCROLL FOR NEXT