कोकण

कुडाळात कचरा डेपोला आग लागल्याने तारांबळ

CD

37589

कुडाळात कचरा डेपोला
आग लागल्याने तारांबळ

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १५ ः कुडाळ नगरपंचायतीच्या सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोला आज दुपारी तीनच्या सुमारास भीषण आग लागली. भर दुपारच्या वेळेस लागलेली आग वाऱ्याने भडकली. या घटनेमुळे प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली.
आगीने रौद्ररुप धारण करीत संपूर्ण कचरा डेपोला वेढा दिला. आगीची माहिती मिळताच नगरपंचायत प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नगरपंचायत व एमआयडीसीचे अग्निशमन बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले. शर्थीचे प्रयत्न करून अखेर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नगरसेवक नीलेश परब, नगरसेविका संध्या तेरसे, श्रेया गवंडे यांच्यासह लोकप्रतिनिधी व नागरिक घटनास्थळी उपस्थित होते. शहरातील गोळा केलेला कचरा सांगिर्डेवाडी (महामार्गानजीक) पाण्याच्या टाकी नजीकच्या जागेत साठविला जातो. या कचऱ्याला आज दुपारी अचानक आग लागल्याने प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT Fina IPL 2026: RCB vs GT आयपीएल 2026 फायनलमध्ये महामुकाबला; बंगळूर की गुजरातची? डबल बारी कोणाची?

Hasan Mushrif vs Shivaji Patil : 'शिवाजीराव मुक्त गोकुळ त्यांना करायचे का?' महायुतीच्या गोकुळमधील पॅनेलवर आमदार शिवाजी पाटलांनी केले वक्तव्य

Latest Marathi News Live Update : क्रीडा, आरोग्य आणि सुदृढतेबाबत शिक्षण दिले, तर त्याचा खूप मोठा फरक पडेल- अभिनेता सुनील शेट्टी

Pune Crime: 'माझा गुन्हा का दाखल केला नाही?' संतापलेल्या महिलेचा पोलिस चौकीत धिंगाणा, वैद्यकीय अहवालात मोठा खुलासा

Mumbai : पावसाने रस्ते निसरडे झाले, अपघातामुळे वाहनांच्या रांगा; तर ओव्हर हेड वायर तुटून मध्य रेल्वेचाही खोळंबा

SCROLL FOR NEXT