झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला गती
डॉ. उदय सामंत ः प्लास्टिक वापरावर कारवाई करा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्या वापरावर सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी जोरदार मोहीम उघडून दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश देतानाच रत्नागिरी नगरपालिका हद्दीतील ७३५ झोपडीधारकांसाठी साडेतीन एकरात झोपडपट्टी पुनर्वसन ग्रीन प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. त्या झोपडीपट्टी धारकांना १६ लाख रुपयांची सदनिका मोफत दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात रत्नागिरी शहर झोपडपट्टी पुनर्वसन आढावा बैठक झाली. बैठकीला नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्याधिकारी वैभव गारवे, नगरसेविका वर्षा ढेकणे, नगरसेवक बंड्या साळवी आदी उपस्थित होते. गारवे यांनी संगणकीय सादरीकरण करून शहरातील झोपडपट्ट्या, त्यामधील लोकसंख्या याचे होणारे पुनर्वसन प्रकल्प इमारत याची माहिती दिली.
पालकमंत्री सामंत म्हणाले, झोपडपट्टीधारकांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची कामगार नोंदणी करावी. ७३५ झोपड्यांमध्ये ३ हजार ३८३ लोकसंख्या सध्या राहते. त्यांच्यासाठी वाहनतळासह अन्य सुविधा देऊन साडेतीन एकरात ११ इमारती बांधण्यात येतील. ३८६ चौफुटाची सदनिका त्यांना मोफत मिळणार आहे. सध्याच्या दरानुसार याची सुमारे १६ लाख रुपये किंमत आहे. झोपडपट्टी पुनर्वसन ग्रीन प्रकल्पाच्या माध्यमातून झोपडपट्टीधारक नव्या वास्तूत आणि शहरात राहायला येतील. शहरात प्लास्टिक पिशव्यांच्या कचरा हा दिवसेंदिवस घातक बनत चालला आहे. जिल्ह्यात सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी या विरोधात मोहीम उघडावी. प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी करावी, दंडात्मक तीव्र कारवाई करावी, असेही पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.