३७८१३
चिपळूण बाजारपेठेने घेतला मोकळा श्वास
नगरपालिका आक्रमक ः अतिक्रमणांवर दररोज हातोडा, गटारावर ठेवलेले साहित्य थेट जप्त करणार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ ः शहरातील बाजारपेठेतील मुख्य व अंतर्गत रस्त्यालगत अतिक्रमण केलेल्या व्यावसायिक व फेरीवाल्यांवर येथील पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने गुरुवारी कारवाई केली. रस्त्यालगतच्या गटारावर दुकानातील माल रचून तेथेच फेरीवाल्यांनीदेखील दुकाने थाटल्याने ही कारवाई करण्यात आली. यापुढे दररोज ही मोहीम राबवली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यापुढे अतिक्रमण केल्यास जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला.
गेल्या काही महिन्यांपासून पालिका ते पानगल्लीदरम्यानचे अतिक्रमण भरमसाठ वाढले होते. रस्त्यालगतच्या गटारावरच फळे, कांदे, बटाटे तसेच प्लास्टिक साहित्य, चप्पल आदी प्रकारची दुकाने थाटून व्यवसाय केला जात आहे. त्याशिवाय ग्रामीण भागातील महिला भाजी व फळविक्री रस्त्यावरच करत असल्याने अडथळे निर्माण झाले होते. काही ठिकाणी गटाराच्या बाहेरदेखील थेट रस्त्यावर दुकानाचा माल मांडला जात होता. या विषयी सातत्याने ओरड झाल्यानंतर मुख्याधिकारी संजय जाधव यांनी गंभीर दखल घेतली. त्यांच्या सूचनेनुसार, पालिकेच्या बांधकाम विभागासह अतिक्रमण हटाव पथकाने गुरुवारी संयुक्त कारवाई केली.
यापुढे सर्वांना अटकाव
संपूर्ण बाजारपेठेत दररोज ही मोहीम सुरू ठेवण्यासाठी अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख संदेश टोपरे यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम विभागातील काही कामगारांची नेमणूकदेखील केली आहे. बऱ्याचदा ग्रामीण भागातील महिला भाजीपाला विक्रीसाठी रस्त्यावरच बसतात; परंतु यापुढे त्यांनाही अटकाव केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.