कोकण

सरकारी कामात अडथळा प्रकरणी एकाला कारावास

CD

38013
शरद गुरव


सरकारी कामात अडथळा
मारहाणप्रकरणी कारावास

खारेपाटण बसस्थानकातील

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १७ : शिवीगाळ, कानशिलात मारुन दहशत निर्माण करणे, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने एकाला कारावासाची शिक्षा सुनावली. खारेपाटण संभाजीनगर (ता. कणकवली) येथील शरद शंकर गुरव (वय ३५), असे आरोपीचे नाव आहे. दोन वर्षे साधा कारावास आणि नऊ हजार रुपये दंड, अशा शिक्षेचा समावेश आहे. खारेपाटण बसस्थानक येथे ही घटना घडली होती. सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी याप्रकरणी काम पाहिले.
न्यायालयात दाखल खटल्यानुसार, १८ मे २०१९ रोजी बुधाजी लक्ष्मण कासार (वय ३२, एसटी वाहक, रा. माजगाव कासारवाडी, ता. सावंतवाडी) हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सावंतवाडी आगाराचे बसचालक संदीप दामोदर कोटगी यांच्या समवेत कर्तव्यावर होते. ते रत्नागिरीत जाताना सकाळी ९.२० वाजता खारेपाटण बसस्थानक येथे आले असता, आरोपी शरद शंकर गुरव याने त्याची मोटार बसस्थानकात उभे केले. यामुळे बस लावण्यासाठी अडथळा होत होता. त्यामुळे वाहक बुधाजी कासार यांनी आरोपी शरद गुरव यास मोटार बाजुला घेण्यास सांगितले. त्या गोष्टीचा राग आल्याने त्याने वाहक कासार यांना शिवीगाळ करून, कानशिलात मारली. त्यामुळे वाहक बुधाजी कासार यांनी, कणकवली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शंकरराव इंदलकर यांच्या न्यायालयात याबाबतची सुनावणी पूर्ण झाली. आरोपीला एकूण तीन गुन्ह्यांत शिक्षा सुनावली आहे. त्यातील एकत्रित शिक्षा म्हणून दोन वर्षे साधा कारावास आणि नऊ हजार रुपये आर्थिक दंड ठोठावला आहे. पोलिस उपनिरीक्षक राजवर्धन खेबुडे यांनी या प्रकरणात तपासी अधिकारी म्हणून काम पाहिले. एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी -बुधाजी कासार, साक्षीदार संदीप कोटगी, पद्माकर अवसरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र मांडवरे, तपासिक अधिकारी उपनिरीक्षक राजवर्धन खेबुडे यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT