संगमेश्वरमध्ये गावठी दारूवर कारवाई
संगमेश्वरः येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध गावठी हातभट्टी दारूविरोधात विशेष मोहीमे अंतर्गत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून गावठी दारूसाठा जप्त केला आहे. १५ एप्रिलला कळंबुशी-मधला करंडा येथे ही कारवाई करण्यात आली. येथील रहिवासी संशयित विनायक वसंत चव्हाण (वय ५८) याने घराच्या पाठीमागील जंगलमय भागात विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू जवळ बाळगली होती. पोलिस कॉन्स्टेबल वैभवकुमार नारायण चौगले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घटनास्थळावरून सुमारे १० लिटर मापाचा प्लास्टिक कॅन जप्त केला आहे, ज्यात ९ लिटर गावठी दारू होती. या मुद्देमालाची ९५० रुपये इतकी आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. दुसरी कारवाई १६ एप्रिलला संगमेश्वर येथील पावटा मैदानाच्या नदीकिनारी करण्यात आली. या ठिकाणी संशयित अनंत सोमा जाधव (वय ५७, रा. माभळे-जाधववाडी) हा विनापरवाना गावठी दारू बाळगल्याप्रकरणी पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पोलिस शिपाई मृणाल चिंतामणी घोलप यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या ठिकाणाहून ८ लिटर गावठी दारू असलेला १० लिटरचा प्लास्टिक कॅन जप्त केला असून, याची किंमत ८७५ रुपये आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.