खेड लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी दळवी
खेड ः येथील ‘लायन्स क्लब ऑफ खेड सिटी’च्या अध्यक्षपदी अविनाश दळवी यांची २०२६-२७ या वर्षासाठी सर्वांनुमते निवड करण्यात आली. पदाधिकाऱ्यांच्या विशेष बैठकीत ही नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्ष अविनाश दळवी, सचिव उत्तम कांबळे, खजिनदार संदीप मोरे, उपाध्यक्ष सागर करवा यांचा समावेश आहे. दरवर्षी नवीन नेतृत्वाकडे जबाबदारी सोपविल्यामुळे क्लबच्या सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांना अधिक गती मिळते. दळवी यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात क्लबचे कार्य अधिक व्यापक होईल आणि नवनवीन प्रकल्प राबविले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
-------
चाकाळेतील शिबिरात ११४ जणांची तपासणी
खेड ः चाकाळे येथील महालक्ष्मी मंदिरात ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या अभियानांतर्गत मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर झाले. देवा ग्रुप फाउंडेशन, जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा क्षयरोग केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र (जामगे) आणि अष्टविनायक हॉस्पिटल (नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर राबविण्यात आले होते. या शिबिरात एकूण १८७ ग्रामस्थांनी भेट दिली, त्यापैकी ११४ जणांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ४ रुग्ण गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे निदान झाले असून, त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबई येथे पाठविण्यात आले आहे. यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध आरोग्य योजनांची माहिती देण्यात आली. सरपंच सौ. श्रद्धा भिलारे, ग्रामकमिटी सदस्य अनिल जाधव, लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे माजी अध्यक्ष शंकर पार्टे, खेड नगरपालिकेचे नगरसेवक मिनार चिखले व नाना चिखले, चाकाळे ग्रामस्थ मंडळाचे सदस्या यांनी सहकार्य केले.
-----
डावखरेंकडून कोळंब शाळेला संगणक संच भेट
राजापूर ः तालुक्यातील कोळंब येथील शाळेला विधान परिषद आमदार निरंजन डावखरे यांनी आमदार स्थानिक विकास निधीतून संगणक संच प्रदान केला आहे. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाला मोठी मदत होणार असून, ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या संगणक संचाचे औपचारिक उद्घाटन नुकतेच कोळंब शाळेत झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञानाची ओळख व्हावी आणि ‘डिजिटल स्कूल’ संकल्पना प्रत्यक्षात उतरावी, या उद्देशाने हा संच देण्यात आला आहे. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष मोहन घुमे, ॲड. एकनाथ मोंडे आणि महिला आघाडीच्या शीतल रहाटे यांचे विशेष आभार मानले.
यावेळी सरपंच शाहू पाटेकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश सुतार, कोळंब ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष धोंडू महाराज पाटेकर, मुख्याध्यापक जयेश तेलंग, तसेच देवजी पाटेकर, राजाराम पाटेकर, जयदीप पाटेकर, सुरेश पाटेकर, शशिकांत शिंदे, सुप्रिया पाटेकर, सुनीता पाटेकर, समीक्षा पाटेकर, नीता तोरसकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक जयवंत पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रणाली मोरे यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.