Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

Gold Demand India : गेल्या वर्षीच्या १६,००० कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा विक्रीत लक्षणीय वाढ अपेक्षित आहे.२०२६ मध्ये सोन्याचा भाव १० ग्रॅममागे १.५८ लाख आणि चांदी २.५५ लाख प्रति किलो झाली आहे.वाढत्या किमतींमुळे ग्राहकांच्या खरेदी पद्धतीत बदल दिसून येत आहे.
Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज
Updated on

सोने आणि चांदीचे भाव आतापर्यंतच्या उच्चांकावरून काहीशा खाली आल्या असल्या, तरीही सोन्याचा भाव १० ग्रॅममागे १.५० लाख रुपयांच्या वरच कायम आहे, तर चांदीचा भाव प्रति किलो २.५० लाख रुपयांच्या वर टिकून आहे. असे असूनही, अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने आणि चांदीची मागणी मात्र जोमदार असल्याचे दिसून येत आहे. अक्षय्य तृतीयेनिमित्त २०,००० कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही आकडेवारी गेल्या वर्षी झालेल्या व्यवसायाच्या तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com