कोकण

वाढलेल्या भेसळीने ‘हापूस’ बदनाम

CD

KOP26O38354
KOP26O38353
देवगड ः येथील हापूस आंबा.


वाढलेल्या भेसळीने ‘हापूस’ बदनाम

नवनवे फंडे; ग्राहकांची होतेय फसवणूक


शिवप्रसाद देसाई : सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता.१९: हवामानातील बदलाचा मोठा फटका बसल्यामुळे कोकणातील हापूसचे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घटले असतानाच, दुसरीकडे परराज्यातील आंब्याची ‘रत्नागिरी’ आणि ‘देवगड’ हापूसच्या नावाखाली भेसळ वाढली आहे. यामुळे कोकणच्या हापूसची बदनामी होत आहे.
यंदा वातावरण बदलाचा खूप मोठा फटका कोकणातील हापूसला बसला. भरपाई मिळावी यासाठी या भागात आंदोलनही उभारले गेले आहे.सरकारी अहवाल आणि स्थानिक बागायतदारांच्या मते, यंदा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतून केवळ १० ते २० टक्केच आंबा बाजारपेठेपर्यंत पोहोचत आहे. ९० टक्के मोहोर गळाल्याने बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. असे असूनही बाजारपेठेत आंब्याची कमतरता जाणवत नसल्याचे चित्र आहे.याचे मुख्य कारण म्हणजे कर्नाटक आणि इतर राज्यांतील आंब्याची होणारी घुसखोरी हे आहे.
परराज्यातील आंबा कोकणचा वाटावा यासाठी विक्रेते चक्क ''मराठी वृत्तपत्रांची रद्दी'' आणि ''देवगड-रत्नागिरी'' असे नाव असलेले बॉक्स पॅकिंगसाठी वापरत आहेत. ग्राहकांना अस्सल हापूसची ओळख नसल्यामुळे त्यांची आर्थिक फसवणूक होत आहे. परराज्यातील आंब्याला कोकणच्या हापूससारखी चव नसल्याने, हा आंबा खाल्ल्यानंतर ग्राहकांमध्ये कोकणच्या हापूसबद्दल चुकीचा समज निर्माण होत आहे.
अस्सल हापूस ओळखण्यासाठी ''जीआय'' मानांकन आणि क्यूआर कोडची व्यवस्था करण्यात आली असली, तरी ती अद्याप सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचलेली नाही. केवळ मोजकेच जागरूक ग्राहक या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. परिणामी, भेसळ रोखण्यासाठी ही यंत्रणा सध्या तरी अपयशी ठरताना दिसत आहे.या भेसळीमुळे कोकणच्या हापूसचा ब्रँड बदनाम होत आहे. शासनाने राज्याच्या सीमेवरच परराज्यातून येणाऱ्या आंब्याची कडक तपासणी करावी आणि स्थानिक यंत्रणेने भेसळयुक्त आंबा विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बागायतदारांकडून केली जात आहे.
---------------
हापूस ओळखायचा कसा?

देवगड हापूस:
*याची साल काहीशी पातळ
*साल ओढल्यावर आतील मांसल भाग त्याला चिकटत नाही.
*रंग आकर्षक केसरी
*देवगड आणि रत्नागिरी यांच्या सुगंधातही फरक
*आकार थोडा गोलसर
.......
रत्नागिरी हापूस
*साल थोडीशी जाड
*साल ओढल्यास सोबत रस आणि थोडासा मांसल भाग चिकटून येतो.
*आंब्याचा रंग थोडासा पिवळसर
*देवगडच्या तुलनेत फळाचा आकार लांबट
.....
कर्नाटकचा हापूस
*आतून रत्नागिरी हापूसपेक्षा पिवळाधम्मक
*पक्व होण्याआधी हिरवट रंगावर काळपट छटा
*चव थोडी आंबट
*पक्व झाल्यावर देठ खूप आत (खड्डा)
.......
कोट
यंदा हापूस बागांमधील परिस्थिती खूप बिकट आहे. मार्केटमध्ये पोहोचणाऱ्या आंबा फळांची संख्या खूपच कमी आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन भेसळ केली जात आहे. यामुळे देवगड आणि रत्नागिरी हे दोन्ही हापूस बदनाम होणार आहेत. आधीच वातावरणाच्या माऱ्याने बागायतदार हतबल आहेत, त्यात या नव्या बदनामीची भर पडली आहे.
- बाळ मुळम, बागायतदार, देवगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: शशांक सिंगने दोन सोपे झेल टाकले; अर्शदीप भडकला, पाँटिंग तापला... श्रेयस अय्यरने काय केले ते पाहा Video Viral

तन्वी कोलते ठरली 'Bigg Boss Marathi 6' ची महाविजेती, राकेशचं स्वप्न राहिलं अपूरं

IPL 2026 Point Table: अपराजित पंजाब किंग्स! अव्वल स्थानावरील पकड मजबूत; लखनौ सुपर जायंट्सची अवस्था काय? पाहा गुणतालिका

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

SCROLL FOR NEXT