कोकण

मंडणगड ः विणीच्या हंगामात पक्ष्यांवर वणव्याचे सावट

CD

Rat20p9.jpg
38504
पाले: पक्षांचा विणीचा हंगाम सुरू असून, करवंदीच्या झाडावर बुलबुल पक्ष्याने बांधलेले घरटे.
---------------
विणीच्या हंगामात पक्ष्यांवर वणव्याचे सावट
घरट्यांतील अंडी, पिल्लांना धोका; निष्काळजीपणामुळे वाढते संकट
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २० ः कोकणात सध्या विविध पक्ष्यांचा विणीचा हंगाम बहरात आला असून, करवंद, खैरसारख्या काटेरी झुडपांपासून ते घराशेजारील फुलझाडांपर्यंत सर्वत्र पक्ष्यांची घरटी दिसत आहेत. या घरट्यांतून पिल्लांचा जन्मोत्सव सुरू असताना वाढत्या वणव्यांमुळे या नाजूक जीवनचक्रावर गंभीर संकट उभे राहिले आहे.
मार्च ते मे महिन्यात वाढत्या उन्हामुळे पक्षी सुरक्षित सावलीच्या शोधात झुडपांमध्ये व झाडांवर घरटी बांधतात. करवंदाच्या दाट जाळीत बुलबुल, वटवट्यासारखे पक्षी पिल्लांचे संगोपन करताना दिसतात. नवरंग, खंड्या, हळद्या, मोर आदी विविध पक्ष्यांचा किलबिलाट परिसरात घुमत असून, कीटक पकडून पिल्लांना खाऊ घालण्याचे दृश्य मनाला आनंद देणारे ठरत आहे; मात्र, उन्हाळ्यात लागणारे वणवे या सर्व प्रक्रियेला मोठा फटका देत आहेत. अनेकदा मानवी निष्काळजीपणामुळे लागलेल्या आगी झपाट्याने पसरून झुडपे आणि त्यावरील घरटी भस्मसात करतात. परिणामी, अंडी व पिल्ले नष्ट होतात आणि अनेक पक्ष्यांचा संपूर्ण प्रजनन हंगाम धोक्यात येतो. वादळीवारे, वन्यप्राणी आणि मोठ्या पक्ष्यांमुळेही घरट्यांचे नुकसान होते; मात्र वणव्याचा परिणाम सर्वाधिक गंभीर आहे. सुरक्षितपणे पिल्ले वाढवलेल्या घरट्यांचा पुनर्वापर करणाऱ्या पक्ष्यांची ही नैसर्गिक साखळी वणव्यामुळे खंडित होत आहे.

कोट
वणवे रोखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. जंगल किंवा माळरानात आग लावणे टाळावे, शेतातील कचरा जाळताना दक्षता घ्यावी आणि विणीच्या हंगामात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. निसर्गाशी सुसंवाद राखल्यासच पक्ष्यांचे अस्तित्व आणि पर्यावरणाचा समतोल टिकून राहील.
- शिवाजी सोनवणे, विज्ञान शिक्षक, मंडणगड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

IPL Records : तिलक वर्माची १८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, मुंबई इंडियन्ससाठी झळकावले Fastest Hundred; अनेक पराक्रम

SCROLL FOR NEXT