कोकण

ओम चिन्ह वेद, शास्त्रांचे बोधचिन्ह

CD

-rat२०p१६.jpg-
26O38531
रत्नागिरी : कऱ्हाडे ब्राह्मण संघात आयोजित कार्यक्रमात विनायकशास्त्री पोखरणकर गुरुजी यांचा सन्मान करताना माधव हिर्लेकर. डावीकडून मानस देसाई, ॲड. रूची महाजनी.
------------
ओम हे वेदांचे आद्य बोधचिन्ह
पोखरणकर गुरूजी ः कऱ्हाडे ब्राह्मणसंघात कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : वेदांमधील ओम चिन्ह हे वेद व शास्त्रांचे आद्य बोधचिन्ह आहे. बोधचिन्ह कळण्यासाठी आचरण शुद्ध पाहिजे व विचार हा अत्यंत मन व बुद्धी यांच्या एकत्रीकरणातून प्रकटलेला पाहिजे. आज रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मणसंघाचे बोधचिन्ह अनावरण करताना आनंद होतोय, असे प्रतिपादन वेदमूर्ती विनायकशास्त्री पोखरणकर गुरुजी यांनी केले.
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मणसंघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात अक्षय्य तृतीयेनिमित्त संघाच्या बोधचिन्हाचे अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. या प्रसंगी ॲड. रूची महाजनी, संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर आणि उपाध्यक्ष मानस देसाई उपस्थित होते. संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी २०२७-२८ हे वर्ष संघाचे शताब्दी वर्ष असल्याबद्दल माहिती दिली. वर्षभर विविध कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचे सांगितले.
बोधचिन्ह साकारणाऱ्या कलाकार सिद्धी वैद्य यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. डॉ. बी. डी. पाध्ये यांनी दिलेल्या देणगीतून संघातर्फे आदर्श परिचारिका म्हणून ऋतुजा काळगी यांचा सन्मान करण्यात आला. संचालिका प्रतिभा प्रभुदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. संचालक उमेश आंबर्डेकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘समर्थ’ची भरारी; सर्व १४ जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी

बापरे, ही भेंडी आहे की सोनं? अमेरिकेत ७,२०० रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या भेंडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

Latest Marathi News Live Update : पोलीस स्टेशनच्या अगदी दारातून सायकल चोरीला

Raksha Khadse News: वादळाचा कहर! केळीच्या बागा उद्धवस्त! खडसे शेतात गेल्या अन्..

Kannad News : भोकनगावात २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन संपविले जीवन; चिमुकलीच्या रडण्यामुळे घटना आली उघडकीस

SCROLL FOR NEXT