38747
घारपी शाळेला दूरदर्शन संच
बांदा ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घारपी येथे संपर्क फाउंडेशनच्या वतीने दिलेल्या दूरदर्शन संचाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून, त्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी नवे दालन खुले झाले आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य आनंद गावडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष यशोदा गावडे, शिक्षणप्रेमी विजय गावकर, पालक संजय गावडे, उत्तरा नाईक, नियती नाईक, अक्षरा असनोडकर, अंगणवाडी सेविका संजना गावकर, मदतनीस अमृता कविटकर, संचिता सावंत आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दूरदर्शन संचाचे पूजन केले. हा दूरदर्शन संच विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा खजिना ठरणार आहे, असे मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, धर्मराज खंडागळे, मुरलीधर उमरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.