कोकण

नागवेकर आत्महत्या प्रकरण ''सीडीआर'' तपासणी

CD

नागवेकर आत्महत्या; तपास गतीने
सीडीआर छाननी; सावकारी त्रासाचाही शोध
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : तालुक्यातील तोणदे येथील प्रसिद्ध आंबा व्यावसायिक रूपेश उर्फ बाब्या नागवेकर यांच्या आत्महत्येचे गूढ उकलण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. नागवेकर यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत जीवन संपवण्यामागे नेमके कोणते कारण आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिस गेल्या दोन महिन्यांतील कॉल डाटा रेकॉर्डची कसून तपासणी करत संशयास्पद व्यक्तींचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी तोणदे येथील आंबा व्यावसायिक बाब्या नागवेकर यांनी स्वत:वर शेती संरक्षण बंदुकीमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. आजारपण व कर्ज व्यवहारामुळे ही आत्महत्या केल्याची चर्चा सुरू होती. पोलिसांनी सर्व पर्याय डोळ्यासमोर ठेवत तपास सुरू ठेवला आहे. मागील दीड-दोन महिन्यात आलेल्या कॉलची माहिती, सीडीआर रिपोर्ट पोलिस घेत आहेत. अनेकवेळा फोन करणाऱ्यांना बोलावून त्यांचे जबाबही पोलिस घेत आहेत. सावकारीच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली का? याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. घरातील व्यक्तींचेही लवकरच जबाब नोंदवले जाणार आहेत. त्यातून तपासाच्यादृष्टीने आणखी काही माहिती हाती येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात कोणी जबाबदार असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाणार, असे संकेत ग्रामीण पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BJP Protest Viral Video : वरळीत भाजप मोर्चामुळे वाहतूक ठप्प; कोंडीत अडकलेल्या महिलेने गिरीश महाजनांना झापलं, व्हिडिओ व्हायरल

SRH vs DC: Abhishek Sharma चं वादळी शतक! रोहित शर्माला मागे टाकत विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी; हैदराबादने रचला धावांचा डोंगर

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! व्याजाच्या पैशांच्या बदल्यात महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले

Video: पुण्यात पीएमपी बस थेट दुकानात घुसली! अप्पा बळवंत चौकातील थरार; व्हिडीओ व्हायरल

Baramati News : जय पवार यांच्या भाषणाने बारामतीकर भावुक.....

SCROLL FOR NEXT