38743
मालवण मेढा येथे तरुणाची
गळफास घेऊन आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २१ : शहरातील मेढा येथील रहिवासी सर्वेश संतोष पराडकर (वय ३५) या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० एप्रिल रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास सर्वेश पराडकर हा आपल्या मेढा येथील राहत्या घरात नायलॉनच्या दोरीने पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने उपचारासाठी मालवण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी मृताचे वडील संतोष भास्कर पराडकर (५९) यांनी मालवण पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस उपनिरीक्षक गणेश माने यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात भेट देऊन पंचनामा केला. पोलिस हवालदार जे. एल. रेवंडकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.