कोकण

महामार्गावरील धोकादायक वळण जैसे थे

CD

- rat२२p४.jpg -
KOP26O38875
संगमेश्वर ः महामार्गावर रामकुंड येथील वळण.

मुंबई-गोवा महामार्ग----------लोगो

संगमेश्वरातील रामकुंडचे जीवघेणे वळण
चौपदरीकरणातही ब्लॅकस्पॉट कायम; वाहनचालक नाराज, सर्वेक्षण करूनही दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २२ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होईल, ही अपेक्षा आता फोल ठरू लागली आहे. संगमेश्वर तालुक्यातील रामकुंड येथील प्रसिद्ध ‘१२ नंबर मोरी’ वरील धोकादायक ‘यू-टर्न’ प्रशासनाच्या अनास्थेमुळे अद्यापही ‘ब्लॅकस्पॉट’ म्हणून कायम आहे. कोट्यवधींचा खर्च आणि उपग्रहाद्वारे सर्वेक्षण करूनही हे मृत्यूचे वळण सरळ न केल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
गेल्या दोन दशकांपासून रखडलेल्या या महामार्गासाठी अनेकदा जमिनीवर मोजमापे घेण्यात आली आणि उपग्रहाच्या साहाय्याने अत्याधुनिक सर्वेक्षणही झाले; मात्र, इतक्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करूनही जर रस्त्यावरील साधे अपघातप्रवण क्षेत्र काढता येत नसतील तर या खर्चिक सर्वेक्षणांचा उपयोग काय? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत.
रामकुंड येथील १२ नंबर मोरी हे ठिकाण अपघातांसाठी कुप्रसिद्ध आहे. विशेषतः परप्रांतीय चालक आणि अवजड वाहनांना रात्रीच्या वेळी या तीव्र वळणाचा अंदाज येत नाही. परिणामी, येथे वाहने उलटून मोठी जीवित व वित्तहानी होण्याचे प्रमाण वाढले आहे. महामार्गाच्या कामात मोठमोठे डोंगर कापून रस्ता रुंद करण्यात आला, मग हे छोटेसे वळण सरळ करण्यात कंत्राटदाराला काय अडचण होती? हा आता संशोधनाचा विषय ठरला आहे.
----
दुर्घटनेची टांगती तलवार
रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे जात असतानाही हे वळण कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हा मार्ग प्रवाशांसाठी सोयीचा ठरण्याऐवजी जीवघेणा ठरण्याची भीती अधिक आहे. एखादा मोठा बळी गेल्यावरच सरकारला जाग येणार का? असा सवाल आता वाहनचालक विचारत आहेत.
---
कोट
चौपदरीकरणामुळे रस्ते महामार्गासारखे सुटसुटीत होतील, असे वाटले होते; पण रामकुंडाच्या वळणावर आल्यावर आजही जीव मुठीत धरून गाडी चालवावी लागते. महामार्गासाठी अख्खे डोंगर फोडले, मग हे एक वळण काढायला सरकारला काय अडचण होती? प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे निष्पापांचे जीव जात आहेत.
- सचिन कदम, वाहनचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud : व्हॉट्सॲप लिंक, बनावट ईमेल व ‘डिजिटल अरेस्ट’च्या आमिषाने पुण्यात ४८ लाखांची सायबर फसवणूक

LSG vs RR Live: वैभव सूर्यवंशीची दुसरी धाव अन् ग्लेन मॅक्सवेल, पृथ्वी शॉचा यांचा मोठा विक्रम मोडला! दिग्वेश राठीने भन्नाट झेल टिपला Video

Latest Marathi News Live Update: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत माझे चांगले संबंध- खासदार अशोक चव्हाण

Shirur Law & Order: : शिरूर तालुका नशामुक्तीसाठी तहसिलसमोर आठव्या दिवशीही सत्याग्रह; पोलिस प्रशासनावर निष्क्रियतेचे आरोप

Nilanga Crime : साडीने हातपाय बांधून तरुणाचा महिलेवर अत्याचार; माणुसकीला काळिमा फासणारी घटना, नराधम तरुण पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT