कोकण

तळेरे बसस्थानकात ‘स्मार्ट कार्ड’ शिबिर

CD

38957

तळेरे बसस्थानकात
‘स्मार्ट कार्ड’ शिबिर

लाभ घेण्याचे सरपंचांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २२ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) तळेरे बसस्थानकामध्ये गेल्या आठवड्यापासून प्रवास शुल्क सवलतीस पात्र असलेल्या लाभार्थ्यांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर सुरू करण्यात आले आहे. या शिबिराच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी सरपंच हनुमंत तळेकर यांनी नुकतीच भेट दिली. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच हनुमंत तळेकर यांनी केले आहे.
एसटी महामंडळामार्फत प्रवाशांना विविध सवलती दिल्या जातात. या सवलतींचा लाभ डिजिटल पद्धतीने सुलभतेने मिळावा, यासाठी नवीन स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येत आहे. तळेरे बसस्थानकावर सुरू असलेल्या या शिबिरामुळे स्थानिक ग्रामस्थांची सोय झाली असून, सरपंच तळेकर यांनी यावेळी कार्ड वितरणाची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती अधिकार्यांकडून घेतली. या शिबिरामध्ये प्रामुख्याने १२ वर्षावरील सर्व मुली व महिला, ६५ वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिक, ७५ वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांनी आपली नोंदणी करून स्मार्ट कार्ड प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सरपंच हनुमंत तळेकर यांनी आवाहन केले की, शासनाच्या या सवलतींचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी आपले स्मार्ट कार्ड काढून घ्यावे. या भेटीदरम्यान सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव उपस्थित होते. या शिबिराबाबत अधिक माहितीसाठी किंवा नोंदणीसाठी महामंडळाचे अधिकृत प्रतिनिधी सत्यवान आळवे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver : कर्जमाफी बँकाच्या वसुलीसाठी आहे का? त्रुटी दूर केल्या नाही तर पुन्हा आंदोलन करणार; बच्चू कडूंचा सरकारला इशारा

Dapoli Mandangad Highway : दापोली-मंडणगड महामार्गाची दुरवस्था! विसापूर फाट्यापर्यंत रस्त्याची चाळण; वाहनचालकांना करावी लागतेय मोठी कसरत, पर्यटनालाही फटका

Latest Marathi News Live Update : बार्शी - सोलापूर मार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू

Dadar Accident: दादरमध्ये बेस्टची गाड्यांना धडक, अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Sharad Pawar: विरोधी आघाडी मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू: शरद पवार, निवडणुकीपूर्वी मोठे राजकीय संकेत

SCROLL FOR NEXT