- rat२२p६.jpg-
26O38877
संगमेश्वर ः चाळण झालेला तुरळ-धामापूर रस्ता.
तुरळ-धामापूर रस्ता ‘मृत्यूचा सापळा’
प्रशासकीय अनास्था; खड्ड्यांमुळे अपघात; महिलेचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २२ : संगमेश्वर तालुक्यातील तुरळ-धामापूर-करजुवे या मुख्य रस्त्याची गेल्या वर्षभरापासून अक्षरशः चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा मार्ग आता ‘मृत्यूचा सापळा’ बनला असून, या खराब रस्त्यामुळे झालेल्या अपघातात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतरही देवरूख बांधकाम विभाग सुस्त असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तुरळ-धामापूर-करजुवे या मुख्य रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून देवरूख येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देण्यात आली आहेत; मात्र, अधिकाऱ्यांनी केवळ आश्वासनापलीकडे काहीच दिले नाही. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहन चालवणे जिकिरीचे झाले असून, आतापर्यंत या मार्गावर १० ते १२ छोटे-मोठे अपघात झाले आहेत.
---
ग्रामस्थांच्या संयमाचा अंत
वारंवार आंदोलनाचे इशारे देऊनही प्रशासनाने साधं खड्डे भरण्याचं काम किंवा डांबरीकरण केलेलं नाही. प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेमुळे तुरळ-धामापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा संयम आता सुटला आहे. शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याचे काम सुरू न केल्यास संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिक रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन छेडतील आणि लाक्षणिक उपोषण करतील, असा इशारा देण्यात आला आहे.
---
दृष्टिक्षेपात
* मार्गावर १०हून अधिक अपघात
* सहा महिन्यांपासून बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
* तत्काळ डांबरीकरण आणि खड्डे भरण्याचे काम सुरू करा
---
कोट
या रस्त्याची अवस्था इतकी भीषण झाली आहे की, निष्पापांचे बळी जात आहेत. वारंवार तक्रार देऊनही देवरूख बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग येत नाहीये. एका माऊलीचा बळी गेला तरीही शासन ढिम्म आहे. आता आम्ही केवळ निवेदने देणार नाही; जर तातडीने दुरुस्ती झाली नाही तर तीव्र आंदोलन करू. याला सर्वस्व शासन आणि संबंधित अधिकारी जबाबदार असतील.
- अरविंद जाधव, माजी सरपंच, तुरळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.