कोकण

- व्यक्तिमत्व विकास शिबिर सुरू

CD

rat२३p१.jpg-
26O39062
रत्नागिरी : के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात चित्रकलेचे प्रात्यक्षिक करून घेताना रघुनाथ आडिवरेकर.

अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात
व्यक्तिमत्त्व विकास शिबिर सुरू
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : येथील कै. केशव परशुराम अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी रघुनाथ आडिवरेकर (आडिवरे) यांनी हस्ताक्षर मार्गदर्शन केले. वळणदार अक्षर कसे काढावे आणि बाराखडीचे सुबक अक्षरलेखन करण्याचे मार्गदर्शन केले.
आडिवरेकर यांनी सृजनशील अक्षरलेखन व चित्रकला या विषयाबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना अक्षरलेखन, चित्रकला आणि सृजनशील कौशल्यांचा अभ्यास प्रत्यक्ष मार्गदर्शनातून करून देण्यात आला. झाड, फुल, पाने, घर, पोपट, चिमणी, बदक, कुत्रा आदी विविध आकार सोप्या पद्धतीने काढण्याचे प्रात्यक्षिक दाखवल्याने चित्रकलेबद्दलची आवड आणि आत्मविश्वास वाढला. आडिवरेकर यांनी स्वत:च्या संग्रहातील नाणी, नोटा, पोस्टाची तिकिटे, वर्तमानपत्रांतील कात्रणांचा संग्रह सादर केला. शिबिरात कलाकार श्वेता केळकर-जोगळेकर या पाईपपासून आकर्षक फुले बनवणे, चित्रकलेविषयी अनन्या कीर मार्गदर्शन करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balen Shah: सीमा वादावर बालेन शाहांना ‘सायलेंट मोड’वर कोणी टाकलं? नेपाळमध्ये मोठा राजकीय निर्णय, आता फक्त शिशिर खनालच बोलणार

Chess Champion: कार्लसन विसरा, जगाला हादरवणारा 'हा' भारतीय खेळाडू ठरतोय सर्वात धोकादायक; दिग्गजाचा मोठा दावा!

'गुलकंद'नंतर समीर चौघुले दिसणार 'साखर खाल्लेला माणूस' सिनेमात ! सोशल मीडियावर पोस्टर रिलीज

Horoscope : येत्या 72 तासांत बनतोय धनयशस्वी योग! 'या' 5 राशींना मिळणार विशेष लाभ; आर्थिक भरभराटीसह कुटुंबात येईल मोठी खुशखबर

Latest Marathi News Live Update : शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनाची दिशा ठरणार - संजय राऊत

SCROLL FOR NEXT