कोकण

रेटिना तपासणी शिबिर

CD

‘इन्फिगो’मध्ये उद्यापासून
रेटिना तपासणी शिबिर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये डोळ्यांच्या रेटिना तपासणीचे शिबिर २६ ते २८ एप्रिल या कालावधीत आयोजित केले आहे. यात रेटिनातज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत तपासणी व उपचार करणार आहेत.
डायबेटिस किंवा अन्य कारणामुळे डोळ्यांच्या पडद्यावर परिणाम झाल्यास अनेक रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. परंतु वेळीच तपासणी केल्यास पडद्याची शस्त्रक्रिया, उपचार करता येतात. डॉ. कामत सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत हॉस्पिटलमध्ये तपासणी करणार आहेत. याकरिता पूर्वनोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. रत्नागिरीत सप्टेंबर २०२० पासून साळवी स्टॉप येथे इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सुरू झाले. गेल्या सहा वर्षांत येथे हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. तसेच रेटिनाच्या रुग्णांवरही शस्त्रक्रिया केल्या आहेत. रेटिनातज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत हे चेन्नईच्या शंकर नेत्रालयातील उच्च प्रशिक्षित रेटीनातज्ज्ञ आहेत. ४० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती, अचानक दृष्टी कमी झाली असेल तर, डोळ्यांपुढे काळे ठिपके असल्यास, डायबेटिस असल्यास, ब्लडप्रेशरचा त्रास असल्यास, चष्म्याचा नंबर सतत बदलत असल्यास, पडद्यावर सूज अथवा रक्तस्राव असेल तर किंवा -३ पेक्षा जास्त नंबरचा चष्मा असेल तर डॉक्टरांकडे रेटिना तपासणी करावी, असे आवाहन इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Need This 3 Changes: कर्णधार बदला, दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता अन्... ७ सामने राहिलेत, लवकर पाऊल उचला...

उच्च न्यायालयाचा बँक ऑफ बडोदाला दणका! सायबर फसवणुकीतील पैसे वृद्धेला परत करण्याचे आदेश

'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होते दीपिकाचे वडील; तिचं लग्न झाल्यावर बाथरूममध्ये बसून रडलेले, कोण आहे ती अभिनेत्री?

Alephata Crime : भोंदूगिरीच्या नावाखाली अत्याचार; आळेफाट्यात दोन 'बाबांना' बेड्या

Pune Bribe Case : भूजल सर्वेक्षण विभागातील दोन भूवैज्ञानिक लाच घेताना ताब्यात

SCROLL FOR NEXT