कोकण

:राजापुरात खरीपासाठी १८७१ मेट्रीक टन खताची मागणी

CD

राजापुरात खरिपासाठी १८७१ टन खताची मागणी
कृषी विभागाचे नियोजन ; ६२०.२५ क्विंटल बियाण्याची गरज
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २४ : यावर्षीच्या शेतीच्या खरीप हंगामाचेही नियोजन करण्यामध्ये शेतकऱ्यांसह कृषी विभाग गुंतला आहे. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी उद्दिष्ट निश्‍चित केलेल्या राजापूर तालुक्यातील क्षेत्रासाठी आवश्यक खते आणि बी-बियाण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यामध्ये निर्धारित ७ हजार ४५ हेक्टर क्षेत्रासाठी सुमारे ६२०.२५ क्विंटल बियाणे आणि १८७१.०८ मेट्रीक टन खताची आवश्यकता असल्याची माहिती पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून देण्यात आली.
खते अन् बी-बियाण्यांच्या विक्रीमध्ये पारदर्शकता राहावी म्हणून पॉश मशिनचा वापर करून खते-बी-बियाण्यांची विक्री करावी, अशी सूचना विक्रेत्यांना देण्यात आल्याची माहिती पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून देण्यात आली. खरीप हंगाम तोंडावर आलेला असून शेतीची कामे उरकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ७०४५.६९ हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. त्यामध्ये भात, नागली, तृणधान्य, कडधान्य यासह गळीतधान्य लागवड करण्यात येणार आहे. यावर्षी सुमारे ६२०.२५ क्विंटल विविध बी-बियाणे आणि सुमारे १८७१.०८ मेट्रीक टन खताची आवश्यकता आहे. त्यानुसार मागणीही नोंदविण्यात आली आहे.
---
चौकट ः
खरीप हंगामावर युद्धाचे सावट
सध्या अमेरिका आणि इराण देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे जगभरामध्ये पडसाद उमटले आहेत. त्यामुळे विविध वस्तूंचे दरही भडकले आहेत. भविष्यामध्ये खतांचे दर भडकण्याची शक्यता आहे. युद्धजन्य स्थिती आणि त्यातून, उपलब्ध होणारी खते अन् अन्य कृषिजन्य वस्तू यांचा यावर्षीच्या खरीप हंगामाचे नियोजन करताना प्राधान्याने विचार करण्यात आल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
---------------
कोट
२०२६ च्या खरीप हंगामातील शेती उत्पादनाच्यादृष्टीने कृषी विभागाकडून नियोजन हाती घेण्यात आले आहे. त्यामध्ये खते आणि बी-बियाण्यांची आवश्यकता आणि मागणी याचेही नियोजन करण्यात आले. खते-बी-बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या प्रशासनाकडून भेटी-गाठी घेतल्या जात असून विक्रीमध्ये पारदर्शकता रहावी म्हणून पॉश मशीनचा वापर करून विक्री करण्याच्या सूचना विक्रेत्यांना दिल्या आहेत.
- प्रथमेश पाटील, कृषी अधिकारी, राजापूर पंचायत समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT